Colvale Jail: कोलवाळात कैद्यांकडून 23 मोबाईल्स, ड्रग्ज जप्त

महानिरीक्षकांकडून अचानक झाडाझडती
 Colvale Jail Goa
Colvale Jail Goa Dainik Gomantak

कारागृहाच्या प्रमुख प्रवेशद्वारांवर तीन ठिकाणी पोलिसांकडून तपासणी केली जाते; तरीही मोबाईल्स तसेच ड्रग्ज कैद्यांपर्यंत पोहचत असल्याचे तुरुंग महानिरीक्षकांनी काही पोलिसांसह आज, रविवारी ५ मार्चला अचानक टाकलेल्‍या छाप्यावेळी स्पष्ट झाले. कारागृहातील कैद्यांमधील गटबाजी व त्यांच्यामध्ये होणाऱ्या हाणामाऱ्यांचे प्रकार हे सुरूच असतात.

या कैद्यांपर्यंत मोबाईल संच तसेच ड्रग्ज तेथील कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादानेच आतमध्ये पोहोचते, हे बोलले जात असले तरी अजूनपर्यंत कोणावरही कारवाई झालेली नाही. तुरुंग कर्मचारी व कैद्यांमध्ये मिलीभगत असल्यामुळेच हे शक्य आहे.

 Colvale Jail Goa
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घेतली केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची भेट, 'या' विषयावर झाली चर्चा

कोलवाळ येथील राज्य मध्यवर्ती कारागृहाची सुरक्षा व्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. तुरुंग महानिरीक्षकांनी काही पोलिसांसह आज अचानक टाकलेल्‍या छाप्‍यावेळी कैद्यांच्या खोली क्रमांक ४मध्‍ये २३ मोबाईल हँडसेट, चार्जर्स, ईअरफोन्स तसेच गांजा आढळून आला. काही कैद्यांनी कारवाईबाबत हुज्जत घातली. मात्र, त्यांना हिसका दाखवून गप्प बसवण्यात आले.

 Colvale Jail Goa
Fire in Goa: म्हादई अभयारण्यात वणवा

कैद्यांकडून हुज्जत

1 कारागृहाचा ताबा देण्यात आलेले पोलिस महानिरीक्षक ओमवीर सिंग बैष्णोई यांनी काही पोलिस कमांडोंच्या मदतीने रविवारी सकाळी ११.३० वा. कारागृहाला भेट दिली.

2 त्यांच्यासह बहुतेक कमांडोज हे साध्या वेशात असल्याने प्रवेशद्वारावर असलेले गोवा पोलिस गडबडले.

3 बैष्णोई यांनी सरळ कैद्यांना ठेवण्यात असलेल्या (ड्रग्ज आरोपी) खोलीत प्रवेश केला.

4 कारागृह महानिरीक्षकांनी सर्व कैद्यांना एका बाजूला करत साध्या वेशात असलेल्या पोलिसांना तेथील दोन्ही खोल्यांचा शोध घेण्याचे आदेश दिले.

5 ड्रग्ज सापडल्‍यानंतर काही कैद्यांनी कारवाईबाबत हुज्जत घातली. मात्र, त्यांना हिसका दाखवून गप्प बसवण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com