डिचोली तालुक्‍यात २३७ सक्रिय रुग्ण

Tukaram Sawant
शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020

डिचोली तालुक्‍यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असून आज आणखी ३० हून अधिक नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे.

डिचोली

तालुक्‍यातील मये आणि साखळी परिसरात रुग्ण वाढत असल्याचे आढळून येत आहे. मये मतदारसंघातील हातुर्ली, भावकई, जांभुळभाट, वरपाल पिळगाव, सर्वण भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याची माहिती मिळाली आहे. डिचोली आणि मयेतील एका कारखान्यातही जवळपास २० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याची माहिती आहे. गुरुवारी मये विभागात ९५, डिचोली विभागात ३४ आणि साखळी विभागात १०७ मिळून २३७ सक्रिय रुग्ण असल्याची माहिती मिळाली आहे. कालपर्यंत हा आकडा २१० एवढा होता.

संपादन - यशवंत पाटील

संबंधित बातम्या