नौदल हवाई वाहतूक संग्रहालयाचा 23 वा वर्धापन दिन होणार उद्या साजरा
नौदल हवाई वाहतूक संग्रहालयातील हेलिकॉप्टर Dainik Gomantak

नौदल हवाई वाहतूक संग्रहालयाचा 23 वा वर्धापन दिन होणार उद्या साजरा

गेल्या काही वर्षांत विद्यार्थी, विमानवाहतूक शौकीन, पर्यटक आणि स्थानिक लोकांमध्ये संग्रहालयाची वाढती लोकप्रियता

दाबोळी: येथील नौदल हवाई वाहतूक संग्रहालयाचा (Naval Air Transport Museum) 23वा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. नौदल हवाई वाहतूक संग्रहालय हे आशियातील एक अद्वितीय संग्रहालय आहे, ज्याचे उद्घाटन 12 ऑक्टोबर 1998 रोजी आयएनएस विक्रांत (INS Vikrant) या विमानवाहू युद्धनौकेच्या डेकवर हॉकर सी हॉक हे लढाऊ विमान उतरवणारे पहिले नौदल वैमानिक (सेवानिवृत्त) आरएच ताहिलियानी यांच्या हस्ते करण्यात आले.

नौदल हवाई वाहतूक संग्रहालयातील लढाऊ विमान
नौदल हवाई वाहतूक संग्रहालयातील लढाऊ विमान Dainik Gomantak

गेल्या काही वर्षांत, संग्रहालयाचा विस्तार झाला असून आज इथे 14 प्रकारची विमाने आणि इतर विस्तृत गोष्टींचा समावेश आहे. या संग्रहालयात ऐतिहासिक सुपर कॉन्स्टेलेशन विमानाचे जतन करण्यात आले आहे, ज्यामुळे भारतीय नौदलाला भारतीय हवाई दलाकडून सागरी गस्तीची जबाबदारी स्वीकारण्याचा मार्ग मोकळा झाला. गेल्या काही वर्षांत विद्यार्थी, विमानवाहतूक शौकीन, पर्यटक आणि स्थानिक लोकांमध्ये या संग्रहालयाची लोकप्रियता वाढली आहे. नौदल हवाई वाहतूक संग्रहालय 12ऑक्टोबर 2021 रोजी आपला 23 वा वर्धापन दिन साजरा करीत आहे

Related Stories

No stories found.