सासष्टीत 24 तासांत कोरोनाचे 29 बळी

दैनिक गोमंतक
सोमवार, 10 मे 2021

कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या वाढत चालली असून सासष्टी तालुक्यात गेल्या 24  तासांमध्ये 29  रुग्णाचे निधन झाले आहे. दक्षिण गोव्यातील जिल्हा इस्पितळात 26  व मडगाव इएसआय इस्पितळात 3 कोरोनाबाधित रुग्णांची मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

सासष्टी :  कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या वाढत चालली असून सासष्टी तालुक्यात गेल्या 24  तासांमध्ये 29  रुग्णाचे निधन झाले आहे. दक्षिण गोव्यातील जिल्हा इस्पितळात 26  व मडगाव इएसआय इस्पितळात 3 कोरोनाबाधित रुग्णांची मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सासष्टीत कालपर्यत कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 5695  वर होता तो आज 5956 पोहचला असून आज सासष्टीत 261  नवे कोरोना संक्रमित रुग्ण समोर आले आहेत. गोव्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली असून राज्यात कोरोनामुळे मृत्यूसंख्यासुद्धा वाढत चालल्याने चिंताही वाढलेली आहे. राज्यात कोरोना व्हायरसने मृत्यू झालेल्यांची संख्या 1679   झाली असून गेल्या 24  तासात 67  जणांचा मृत्यू झाला आहे. (In 24 hours, 29 people lost their lives due to corona) 

बेपत्ता अज्ञाताचा मृतदेह गोमेकॉच्या शवागारात

सासष्टी तालुक्यात काल 15 जणांचा मृत्यू झाला होता तर आज 29  जणांचा मृत्यू झाला आहे. सासष्टी तालुक्यातील सर्व आरोग्य केंद्रात मार्च महिन्याच्या सुरुवातीला नोंदणी केलेल्या रुग्णांची संख्या 163  होती तर मार्च अखेर पर्यंत ही संख्या 352 पोहचली होती. पण, एप्रिल व मे महिन्यात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसून येत आहे. गोवा सरकारकडून जारी करण्यात येणाऱ्या अहवालानुसार मडगाव नागरी आरोग्य केंद्रात 6  मे रोजी 2321 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंदणी करण्यात आली होती, आज आकडा 2521 वर पोहचला आहे. कासावली आरोग्य केंद्रात 975  कोरोनाबाधित रुग्णांची नोंदणी करण्यात आली होती तर आज हा आकडा 1028  वर पोहचला आहे.

गोंयकारांनो लस घ्या! गोव्यात 2,40,490 लसींचे डोज शिल्लक

वाळपई आरोग्य केंद्रात  रुग्णांसाठी खाटांची सोय

वाळपई : वाळपई आरोग्य केंद्रात कोविड रुग्णांसाठी एका विभागात खाटांची सोय करण्यात आलेली आहे. कोविड रुग्ण म्हणून आढळून आल्यास काही प्रमाणात तरी रुग्णाला दिलासा मिळावा म्हणून या काही खाटा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. दरम्यान सत्तरी तालुक्यात आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत कोविड रुग्णांसाठी कार्यवाही हाती घेण्यात आली आहे. सत्तरीचे मामलेदार दशरथ गावस यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत सेवा कार्य हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी स्वयंसेवक देखील नियुक्त करण्यात येणार आहेत. होम आयझोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांसाठी ही कार्यवाही हाती घेण्यात येणार आहे.

काणकोणात नवे 122  कोविड रुग्ण

काणकोण :  काणकोणात आज कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १२२  झाली.  काणकोणात आज 122  कोरोना रुग्ण सापडले आहेत. आजपर्यत कोरोना रुग्ण एवढ्या संख्येने एका दिवसात काणकोणात सापडली नव्हते. शुक्रवारी 61 शनिवारी 85 व रविवारी122 करोना ग्रस्ताची नोंद काणकोणात झाली. खोतीगावात दुसऱ्या लाटेत कोरोनाचा संसर्ग नव्हता. मात्र आज या पंचायत क्षेत्रात 4  कोरोनाग्रस्त सापडले आहेत. आज सापडलेल्या रुग्णामध्ये पालिका क्षेत्रात 53 , श्रीस्थळ पंचायत क्षेत्रात18, खोला 4, आगोंद 23, पैंगीण 12, लोलये 3 व गावडोंगरी पंचायत क्षेत्रात 5 व खोतीगावात 4  कोरोनाग्रस्त सापडले आहेत. काणकोणातील आजपर्यंतच्या कोरोनाग्रस्ताची संख्या 2091 झाली असून आतापर्यत1491  कोरोनामुक्त झाले आहेत.

संबंधित बातम्या