'तमनार प्रकल्पानंतर राज्यात २४ तास वीज पुरवठा होईल'

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 17 डिसेंबर 2020

राज्यात अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी तमनार अणुउर्जा प्रकल्पाची अत्यंत गरज असल्याचे मत  मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले होते.  

पणजी-  राज्यात अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी तमनार अणुउर्जा प्रकल्पाची अत्यंत गरज असल्याचे मत  मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले होते.  
 राज्यातील  एकूण परिस्थितीबाबत  ते म्हणाले होते की, 'राज्यातील अजूनही काही भागात २४ तास वीज पुरवठा होत नाही.  राज्य सरकारने याआधी सौरउर्जा प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यावर ५० टक्क्यांची सुट देऊनही फक्त २९ लोकांनीच त्याचा लाभ घेतला होता,' अशी माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी दिली.
  
सद्यस्थितीत  औद्योगिक कारखानांना पुरेशा प्रमाणात वीज पुरवठा  करता येत नाही याची खंत व्यक्त करताना त्यांनी मोलेमच्या जंगलामधून जाणाऱ्या वीज प्रकल्पाला विरोध झाला होता त्याकडेही लक्ष वेधले.        

संबंधित बातम्या