Goa Government : सरकारकडून तब्बल 241 टन तूरडाळीची नासाडी

काँग्रेसच्या अमरनाथ पणजीकरांकडून भांडाफोड; विल्हेवाटीसाठी सरकारने काढली निविदा
Toordal Wasted by Goa Government
Toordal Wasted by Goa GovernmentDainik Gomantak

Goa Government : राज्यातील जनतेला कोरोना काळात वाटपासाठी आणलेल्या तुरडाळीच्या साठ्यातील तब्बल 241 टन डाळ सडली आहे. आता त्या डाळीची विल्हेवाट लावण्यासाठी नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार खात्याने निविदा काढल्याने प्रशासनाचे अब्रूचे पुरते धिंडवडे निघाले आहेत.

काँग्रेस पक्षाने हे प्रकरण बाहेर काढले आहे. त्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मोदी-शहांच्या क्रोनी क्लबच्या फायद्यासाठी मुद्दाम तुरडाळ खराब केली का? असा सवालही काँग्रेसचे माध्यम प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे.

नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार खात्याने स्थानिक दैनिकांमध्ये तूरडाळ विल्हेवाटीसाठीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्या जाहिरातीवरून पणजीकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. 18 जुलै 2022 रोजी जारी केलेल्या सार्वजनिक सूचनांकडे लक्ष वेधले आहे, त्याशिवाय डाळ आयात करण्याचे केंद्र सरकारचे धोरण उघड झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील अत्यंत बेजबाबदार भाजप सरकारने वृत्तपत्रांतून तूरडाळीच्या विल्हेवाटीसाठी निविदा मागविल्याचे पाहून धक्का बसला आहे.

Toordal Wasted by Goa Government
CM Pramod Sawant : गोवा सरकार एक पाऊल मागे

साठा कधी आणला माहीत नाही : पार्सेकर

तूरडाळ विल्हेवाटीसाठी निविदा काढली आहे, ही गोष्ट खरी आहे. हा साठा कधी आणला आणि कसा शिल्लक राहिला याबाबत मला काहीच माहिती नाही, अशी प्रतिक्रिया नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार खात्याचे संचालक गोपाळ पार्सेकर यांनी दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com