‘इंडिगो’चे अडीचशे कर्मचारी संपावर; कंपनी ला बसणार जोरदार फटका

गोमंन्तक वृत्तसेवा
बुधवार, 7 एप्रिल 2021

वेतनवाढ मिळावी व इतर मागण्यांसाठी इंडिगो एयरलाइन्‍सचे सुमारे 250 कर्मचारी दाबोळी विमानतळावर संपावर गेले आहेत. पगार वेळेवर मिळत नसल्याने रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

दाबोळी: वेतनवाढ मिळावी व इतर मागण्यांसाठी इंडिगो एयरलाइन्‍सचे सुमारे 250 कर्मचारी दाबोळी विमानतळावर संपावर गेले आहेत. पगार वेळेवर मिळत नसल्याने रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. भाडेपट्टीवर राहणाऱ्यांना त्यांच्या घर मालकांचा पैशांसाठी तगादा लावत आहेत. तसेच मुलांची शालेय फी आदी प्रश्न त्यांना भेडसावत असल्याचे त्यांनी सांगितले. 

पर्यटक टॅक्सीमालकांचे धरणे; गोवा माईल्‍स टॅक्‍सी सेवा रद्द करा 

दरम्‍यान, व्यवस्थापकाने बाहेरून कामगार वर्ग आणण्यास सुरवात केली असून आम्हाला कामावरून कमी करण्याचा त्यांचा मानस आहे. त्‍यामुळे काम बंद ठेवण्याचा निर्णय कामगारांनी घेतला आहे. दाबोळी विमानतळावर अनेक एअरलाइन्स कंपन्या आहेत. यात अनेक गोमंतकीय तसेच बिगर गोमंतकीय युवक काम करतात. तसेच या कंपन्यांचे व्यवस्थापक बिगर गोमंतकीय असून त्यांनी आपल्या कामगारांची छळवणूक चालवणे नित्याचेच झाले आहे. कधी त्यांच्या पगारात कपात, कामावरून कमी करणे नित्याचेच आहे. 

गोवा: आमदार अपात्रता प्रकरणी 20 एप्रिलला होणार निवाडा 

काढून टाकण्‍याची धमकी..!
दरम्यान येथील इंडिगो एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या व्यवस्थापनाने त्यांचा पगार न देता त्यांची चालवलेल्या छळवणुकीला कंटाळून आज एअरलाइन्सच्या 250 कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवून संपावर गेले. संपावर जाण्याचे त्यांना कारण विचारले असता त्यांच्या व्यवस्थापकाने त्यांचा पगार अडवून ठेवल्याचे सांगितले. तसेच याविषयी जाब विचारली असता कामावरून कमी करण्याची धमकी त्यांना देण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

गोव्यात लागणार लॉकडाऊन? मुख्यमंत्री म्हणाले.. 

 

संबंधित बातम्या