दोन श्रमिक रेलगाड्यांतून २५५५ मजूर बिहारकडे रवाना

dainik Gomantak
सोमवार, 1 जून 2020

मडगाव रेल्वे स्थानकावरून आज दोन श्रमिक रेलगाड्या बिहार राज्यातील २५५५ मजुरांना घेऊन रवाना झाल्या. रेल्वे क्रमांक ०५०२२ मधून अटारीया - बिहारला १४७४ मजूर, तर रेल्वे क्रमांक ०५०२४ मधून बंका - बिहारसाठी १०८१ मजूर रवाना झाले.

नावेली

मडगाव रेल्वे स्थानकावरून आज दोन श्रमिक रेलगाड्या बिहार राज्यातील २५५५ मजुरांना घेऊन रवाना झाल्या. रेल्वे क्रमांक ०५०२२ मधून अटारीया - बिहारला १४७४ मजूर, तर रेल्वे क्रमांक ०५०२४ मधून बंका - बिहारसाठी १०८१ मजूर रवाना झाले.
शनिवारी अटारीया व बंका बिहारसाठी मडगावातून २ रेल्वे सोडण्यात आल्या होत्या. त्यातून ३२२८ मजुरांना पाठवून देण्यात आले होते, अशी माहिती कोकण रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी दिली.
बिहार राज्यात जाण्यासाठी सुमारे १५ हजार मजुरांनी ऑनलाइन नाव नोंदणी केली आहे. राज्याच्या मागणीनुसार बिहारसाठी रेल्वे सोडण्यात येणार असल्याचे घाटगे यांनी सांगितले.
गोव्यात एकूण १ लाख २५ हजार मजुरांनी आपल्या गावी जाण्यासाठी नावनोंदणी केली होती. त्यापैकी सुमारे ७० हजार विविध राज्यातील मजूर आपल्या गावी रेल्वे व बसने गेले असून अनेकजण आपल्या मूळ गावी जाण्यासाठी रेल्वेची वाट पाहात आहेत.
मडगाव, थिवी व करमळी रेल्वे स्थानकावरून श्रमिक रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या. सुमारे ४५ श्रमिक रेल्वे गाड्यांमधून ५० हजार मजूर आपल्या गावाला गेले.
दिल्ली ते मडगाव राजधानी एक्सप्रेस रद्द करण्याची मागणी गोवा सरकारने केंद्र सरकारकडे केल्याने गेले दहा दिवस ती बंद आहे. तिरूअनंतपुरम ते दिल्ली व दिल्ली ते तिरुअनंतपुरम ही राजधानी एक्सप्रेस सुरू आहे.

संबंधित बातम्या