Goa Medical College: ऑक्सिजनच्या कमतरतेमूळे 26 रुग्णांचा मृत्यू

दैनिक गोमंतक
मंगळवार, 11 मे 2021

राणे आणि सावंत यांच्यात मतभेद?

सुप्रीम कोर्ट (Supreme Court), हायकोर्टाचे वेगवेगळे फटकार आणि सरकारचे दावे असूनही ऑक्सिजनच्या (Oxygen) अभावामुळे मृत्यूचे सत्र सुरूच आहे. आता गोव्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (Goa Medical College) 26 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची घटना उघडकीस आली आहे. गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे (Vishwajit Rane) म्हणाले की, हे मृत्यू मंगळवारी पहाटे झाले. तसेच राणे यांनी या घटनेची उच्च न्यायालयात चौकशी करण्याची मागणी केली आहे. गोव्यातील मुंबई हायकोर्टाच्या (Bombay High Court) खंडपीठाने गोव्यातील अव्वल रुग्णालय, गोवा मेडिकल कॉलेज येथे ऑक्सिजन उपलब्धतेच्या कथित कमतरतेची चौकशी केली पाहिजे आणि न्यायालयाने आरोग्यासंदर्भात कोविडचे व्यवस्थापन आपल्या हातात घ्यावे, असे आरोग्यमंत्री राणे यांनी म्हटले आहे. (26 patients died due to lack of oxygen)

गोव्यातील नागरिकांनो सावधान! 'इव्हर्मेक्टिन' औषध न घेण्याचा WHO चा...

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी या रुग्णालयाला भेट दिली होती
विश्वजित राणे यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले जेव्हा मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) यांनी तेथील रुग्णांची प्रकृती जाणून घेण्यासाठी जीएमसीएचला भेट दिली. प्रमोद सावंत म्हणाले की, मी एक बैठक देखील बोलणार असून त्यात सर्व विषयांवर तोडगा काढला जाईल. गोव्यातील रूग्णालयात ऑक्सिजनची कमतरता आहे, कारण सिलिंडर्स रुग्णांपर्यंत वेळेवर पोहोचत नाहीत म्हणून. एका दिवसात ऑक्सिजन पुरवठा प्रक्रिया सुरळीत होईल, असेही सावंत पुढे  म्हणाले.

पत्रकरांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले  “मी कोविड वॉर्डच्या आतील यंत्रणेला आणि लोकांना भेडसावत असलेल्या समस्या पाहिल्या आणि ऑक्सिजनच्या अभावामुळे मृत्यू का होत आहे हे देखील पाहिले. डॉक्टर 100 टक्के काम करत आहेत. डॉक्टर खूप प्रयत्न करीत आहेत. रुग्ण म्हणाले डॉक्टर सर्व प्रकारे मदत करत आहेत.”

राणे आणि सावंत यांच्यात मतभेद?
एका माध्यमाच्या अहवालानूसार गेल्या काही महिन्यांत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी राणेंची कोविड व्यवस्थापनाच्या मुद्द्यांवरून वाद सुरू असल्याचे चित्र आहे. ऑक्सिजनबाबत कोणत्याही प्रकारची अव्यवस्था नसल्याचे राणे म्हणाले होते. ऑक्सिजनच्या उपलब्धतेबाबत सावंत यांची दिशाभूल केली असल्याचेही राणे म्हणाले. मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्यात सुरू असलेले मतभेद राज्यातील वाढत्या कोरोना रुग्ण आणि विषाणूमुळे मृत्यूविरूद्धच्या लढाईत अडथळा आणत असल्याचा आरोपही विरोधकांनी केला आहे. राणे म्हणाले, गैरव्यवस्थापन असल्यास किंवा काही कमतरता असल्यास व तज्ञांचा वापर करून श्वेतपत्रिका आणाली जावी, अशी मी उच्च न्यायालयात विनंती करतो. उच्च न्यायालयाने जीएमसीचे कोविड व्यवस्थापन सांभाळावे. सर्व अव्वल रुग्णालयात रात्री २ ते ६ च्या दरम्यान नियमित मृत्यू होत आहेत. ऑक्सिजनच्या कमतरतेच्या कारणास्तव त्यांची तपासणी करणे आवश्यक आहे. आरोग्यमंत्री म्हणाले, आम्ही कठोर परिश्रम घेत आहोत, परंतु गैरकारभार कोठे आहे हे मला माहिती नाही.

दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन टाकीला गळती

ऑक्सिजन अभावी मृत्यूचे सत्र थांबेना
एक दिवसांपूर्वीच आंध्र प्रदेशातील तिरुपती येथील रुईया सरकारी रुग्णालयात ऑक्सिजन नसल्यामुळे मृत्यू झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. या रुग्णालयात ऑक्सिजन टँकर उशिरा आल्याने कमीतकमी 11 कोविड रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ऑक्सिजन सिलिंडर रीलोड करताना 5 मिनिटांच्या पुरवठ्यात दबाव नसल्यामुळे 11 मौल्यवान जीव गेले. केवळ एक-दोन राज्यांची ही गोष्ट नाही. वेगवेगळ्या राज्यांतील शहरी भागातून या बातम्या येत आहेत. ग्रामीण भागात बर्‍याच ठिकाणी अहवाल येत नाहीत.

संबंधित बातम्या