डिचोलीत कोरोनाचे २७ नवे रुग्ण

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑक्टोबर 2020

डिचोली तालुक्यात कोरोना रुग्णांचा आकडा कमी जास्त होत असून, आज बुधवारी  दिवसभरात तालुक्यात २७ कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. डिचोली विभागात ८,  मये विभागात ४ तर साखळी  विभागात आज  १५ रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती डिचोलीच्या मामलेदार कार्यालयातून उपलब्ध झाली आहे.

डिचोली:  डिचोली तालुक्यात कोरोना रुग्णांचा आकडा कमी जास्त होत असून, आज बुधवारी  दिवसभरात तालुक्यात २७ कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. डिचोली विभागात ८,  मये विभागात ४ तर साखळी  विभागात आज  १५ रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती डिचोलीच्या मामलेदार कार्यालयातून उपलब्ध झाली आहे.

बुधवारी डिचोली विभागात ८७ मये विभागात ७६ आणि साखळी विभागात १४५ मिळून तालुक्यात एकूण ३०८ कोरोनाचे सक्रिय रुग्ण असल्याची माहिती मिळाली आहे. बुधवारी मयेत ३ आणि साखळीत १५ मिळून तालुक्यात १५ रुग्ण बरे झाले आहेत. डिचोलीत मात्र एकही रुग्ण बरा झालेला नाही.अशी  माहिती मिळाली आहे.

तालुक्यातील ६२ रुग्ण कोविड सुविधा केंद्रात उपचार घेत आहेत. तर डिचोलीत-६७ मयेत-६१आणि साखळीत- ९४ मिळून २२२ रुग्णाना होम आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले आहेत. डिचोलीतील ५ मयेतील ६ आणि साखळीतील १३ मिळून तालुक्यातील २४ रुग्णावर अद्यापही कोविड रुग्णालयात उपचार चालू आहेत, अशी माहिती डिचोलीच्या मामलेदार कार्यालयातून मिळाली 
आहे.

संबंधित बातम्या