गोवा रूग्णालय केंद्रांना सज्जतेचे निर्देश; कोविडच्‍या दुसऱ्या लाटेची शक्‍यता             

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 3 एप्रिल 2021

कोविडचे रुग्ण राज्यात दिवसेंदिवस वाढतच आहेत. राजधानी पणजी व पर्वरीत रुग्णसंख्येने दोनशेचा आकडा पार केला आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 280 नव्या रुग्णांची भर पडली असून 24 तासांत म्हापसा येथील 71 वर्षीय महिला रुग्णाचा कोविडमुळे गोमेकॉत मृत्यू झाला आहे.

पणजी: कोविडचे रुग्ण राज्यात दिवसेंदिवस वाढतच आहेत. राजधानी पणजी व पर्वरीत रुग्णसंख्येने दोनशेचा आकडा पार केला आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 280 नव्या रुग्णांची भर पडली असून 24 तासांत म्हापसा येथील 71 वर्षीय महिला रुग्णाचा कोविडमुळे गोमेकॉत मृत्यू झाला आहे. कोविड प्रसाराची दखल मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील राज्य कार्यकारी समितीच्या बैठकीत आज घेण्यात आली. कोविड उपचारांसाठी इस्पितळे व कोविड निगा केंद्रे सज्ज करण्याचे आदेश या बैठकीनंतर जारी करण्यात आले आहेत.

यापूर्वी 26 ऑक्टोबर रोजी एकाच दिवशी 290 रुग्ण सापडले होते. त्यानंतर आजची रुग्णसंख्या सर्वाधिक आहे. पणजीतील रुग्णसंख्या 210 वर पर्वरीतील रुग्णसंख्या 200 वर पोहोचली आहे. गेल्‍या २४ तासांत पणजीतील रुग्णसंख्या 34ने तर पर्वरीची रुग्णसंख्या 43 ने वाढली आहे. लसीकरणाचा व रुग्ण संख्या वाढीचा संबंध आहे का? हेही तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. लस घेतल्यानंतर अनेकांच्‍या शरीराचे तापमान वाढते. त्यामुळे ते चाचणीसाठी गेले आणि त्यांना आधीपासूनच लागण झालेल्या कोविडचे निदान झाले, असे घडत आहे का? याची माहिती आरोग्य खात्याने संकलित करण्याची गरज आहे. त्यातून नेमके चित्र समोर येणार आहे. 
                                                                                                      कोविडचे रुग्ण राज्यात दिवसेंदिवस वाढतच आहेत. राजधानी पणजी व पर्वरीत रुग्णसंख्येने दोनशेचा आकडा पार केला आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 280 नव्या रुग्णांची भर पडली असून 24 तासांत म्हापसा येथील 71 वर्षीय महिला रुग्णाचा कोविडमुळे गोमेकॉत मृत्यू झाला आहे. कोविड प्रसाराची दखल मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील राज्य कार्यकारी समितीच्या बैठकीत आज घेण्यात आली. कोविड उपचारांसाठी इस्पितळे व कोविड निगा केंद्रे सज्ज करण्याचे आदेश या बैठकीनंतर जारी करण्यात आले आहेत.

गोवा-मुंबई हायवेवरील अपघातात एकाचा जागीच मृत्यू 

यापूर्वी 26 ऑक्टोबर रोजी एकाच दिवशी 290 रुग्ण सापडले होते. त्यानंतर आजची रुग्णसंख्या सर्वाधिक आहे. पणजीतील रुग्णसंख्या 210 वर पर्वरीतील रुग्णसंख्या 200 वर पोहोचली आहे. गेल्‍या 24 तासांत पणजीतील रुग्णसंख्या 34ने तर पर्वरीची रुग्णसंख्या 43 ने वाढली आहे. लसीकरणाचा व रुग्ण संख्या वाढीचा संबंध आहे का? हेही तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. लस घेतल्यानंतर अनेकांच्‍या शरीराचे तापमान वाढते. त्यामुळे ते चाचणीसाठी गेले आणि त्यांना आधीपासूनच लागण झालेल्या कोविडचे निदान झाले, असे घडत आहे का? याची माहिती आरोग्य खात्याने संकलित करण्याची गरज आहे. त्यातून नेमके चित्र समोर येणार आहे. 
कोविडच्‍या दुसऱ्या लाटेची शक्‍यता

संबंधित बातम्या