पणजीत अग्नितांडव; कदंब बससह दोन बस जळून खाक

आगीचं कारण अस्पष्ट; आगीमुळे बसचालकांचं लाखोंचं नुकसान
Panaji Bus Stand
Panaji Bus Stand Dainik Gomantak

पणजी : राजधानी पणजीत तीन प्रवासी बस एका रात्रीत जळून खाक झाल्याने खळबळ उडाली आहे. पणजीतील आंतरराज्य बसस्थानकावर या तीनही बस पार्क करण्यात आल्या होत्या. मात्र या बस अचानक आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

पणजी बस स्थानकावर पार्क केलेल्या तीन बसपैकी दोन कदंब आणि एक खासगी अशा तीन प्रवासी बसेस जळून खाक झाल्याची माहिती आहे. या घटनेमुळे कदंब प्रशासनासह दोन खासगी बसचालकांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. आग लागण्याचं कारण अद्याप समजू शकलं नसल्याने घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. पणजी पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू असून मध्यरात्री ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Panaji Bus Stand
राजधानी पणजीसह गोव्यात 'मुसळधार'; गोवेकरांची दाणादाण

पणजीतील कदंब बसस्थानकावरुन राज्यासह राज्याबाहेरही अनेक मार्गांवर बस वाहतूक होते. त्यामुळे हे बसस्थानक नेहमीच गजबजलेलं असतं. अचानक तीन बस जळाल्यामुळे पणजी बसस्थानकावरील सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. तीन बस जळेपर्यंत कुणालाही याची माहिती मिळाली नाही याबाबत आता तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. कुणी जाणूनबुजून ही आग लावली आहे का याचा पोलीस शोध घेत असून आसपासच्या सीसीटीव्हीच्या आधारे आग लागण्याचं नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com