तीन केरळवासीयांचा गोव्यात अपघाती मृत्यू

विष्णू, कन्नन आणि निधिन यांचा जागीच मृत्यू झाला. अखिल आणि विनोद कुमार यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.
तीन केरळवासीयांचा गोव्यात अपघाती मृत्यू

सांकवाळ: गोव्यात (Goa) शुक्रवारी झालेल्या अपघातात तीन केरळवासीयांना (Kerala) आपला जीव गमवावा लागला. कन्नन (24), विष्णू (27) आणि निधिन दास (24) अशी मृतांची नावे आहेत या घटनेवेळी त्यांच्यासोबत असलेले अखिल आणि विनोद कुमार यांची प्रकृती चिंताजनक आहे. सांकवाळ येथील एमईएस कॉलेज जंक्शनवर गुरुवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास हा भीषण अपघात (Accident) घडला. त्यापैकी वाहन चालकाचे नाव अखिल असल्याची माहिती मिळाली आहे. कन्नन आणि विष्णू हे दोघे भाऊ आहेत आणि निधी हा त्यांचा मित्र आहे. विष्णू नौदलाचा अधिकारी म्हणून काम करतो आणि निधी दास गोवा विमानतळावर (Goa Airport) कर्मचारी आहे. तेथे गेल्यानंतर त्यांनी एक कार भाड्याने घेतली आणि गोव्यात फिरायला गेले. कारवरील नियंत्रण सुटल्याने कार भिंतीवर आदळल्याने हा अपघात झाला.

तीन केरळवासीयांचा गोव्यात अपघाती मृत्यू
Haryana: भिवानीमध्ये भीषण अपघात! खाण परिसरात डोंगर कोसळल्याने 10 ते 15 जण बेपत्ता

मिळालेल्या माहितीनुसार, विष्णू, कन्नन आणि निधिन यांचा जागीच मृत्यू झाला. अखिल आणि विनोद कुमार यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. वेगवान कारवरील ताबा सुटून दुभाजकावर आदळल्याने मोठा अपघात झाला आणि केरळ येथील तीघांचा मृत्यू झाला.

तीन केरळवासीयांचा गोव्यात अपघाती मृत्यू
कर्नाटकच्या गाडीला प्रियोळात अपघात

वास्कोच्या दिशेने भरधाव वेगात कार नेत असताना स्टेअरिंगवरील ताबा सुटून गाडी रस्त्यावरील दुभाजकाला आदळली व उलटली. कारमध्ये केरळ येथून आलेले पाच पर्यटक होते. वेर्णा पोलिसांना माहिती मिळताच ते तत्काळ घटनास्थळी दाखल झाले व मदतकार्य सुरू केले. उपलब्ध माहितीनुसार केरळातील या पर्यटकांनी मद्यपान केले होते असे सांगण्यात येत आहे. पोलिसांकडून घटनेचा पंचनामा करण्यात आला असून वेर्णा पोलीस निरीक्षक प्रशाल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.