गोव्यातील ‘3 MTR’मध्ये 123 जवानांनी 19 आठवड्याचे लष्करी प्रशिक्षण केले पूर्ण

गोव्यातील ‘3 MTR’मध्ये 123 जवानांनी 19 आठवड्याचे लष्करी प्रशिक्षण केले पूर्ण
indian Navy.jpg

दाबोळी: गोव्यातील ‘3 एमटीआर’मध्ये 123 जणांनी 19 आठवड्याचे लष्करी प्रशिक्षण (Military training) पूर्ण केले. या प्रशिक्षणाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.  भारतीय सेना ही जगात उत्कृष्ट सेना मानली जाते, असे गौरवोद्‍गार भारतीय नौदलाच्या (Indian Navy) गोवा (Goa)  विभागाचे ध्वजाधिकारी रियर ॲडमिरल फिलीपोज पायनुमुटील यांनी यावेळी काढले. (In 3-MTR, 123 soldiers completed 19 weeks of military training)

सैनिकाच्या तीन दलामध्ये सिग्नल्स आणि संचार ऑपरेशन सर्वात निर्णायक भूमिका निभावतात. दूरसंचार जगामध्ये व्यापक रूपाने विकसित झाले आहे. या विशाल परिवर्तनावर प्रत्येक जवानाने नजर ठेवायला हवी. आपल्या सेवेमध्ये उच्च दर्जाचे  ज्ञान आणि कुशलता पदरात पडून घ्यावे, असे आवाहन ॲडमिरल पायनुमुटील यांनी केले. आपल्या शेजारच्या राष्ट्रांच्या अनिश्चितता, प्राकृतिक संकट आणि सध्या सुरू असलेले ‘कोविड’ संकट लक्षात घेता प्रत्येक सैनिकांनी आपल्या कर्तव्याची जाण ठेवून पूर्णपणे सक्षम झाले पाहिजे, असेही ते म्हणाले.

ॲडमिरल पायनुमुटील यांनी सांगितले की, सिग्नलचे लष्करी पथक भारतीय सेनाचे एक उत्कृष्ट सेना पथक मानले जाते. या नावाला आपल्याला जागलं पाहिजे. या पथकाप्रति इमानदारी, प्रामाणिकपणा आणि सभ्यता या तीन गोष्टी सतत लक्षात ठेवा. ‘3 एमटीआर’ने आतापर्यंत 90 हजारापेक्षा अधिक जणांना सैनिक प्रशिक्षण दिले. त्यामध्ये प्रशिक्षणाचे मोठे योगदान आहे. सिग्नलच्या लष्करी पथकामध्ये गेल्या काही वर्षात मोठी क्रांतिकारी बदल झालेत. आज आमच्याकडे जगातील सर्वात आधुनिक दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान आहे, जे कोणत्याही प्रकारच्या जमीन, मौसम आणि परिस्थितीमध्ये दूरसंचार व्यवस्था उपलब्ध करण्यामध्ये सक्षम आहे, असेही ॲडमिरल पायनुमुटील म्हणाले. 2 एसटीसीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच परेड समीक्षा करण्यासाठी फक्त नौदलाच्या अधिकाऱ्याला संधी देण्यात आली. याबद्दल यांनी 2 एसटीसी ब्रिगेडियर संजय रावल यांचे आभार मानले.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com