ऑनलाईन शिक्षणासाठी डिचोलीतील 30 टक्के विद्यार्थ्यांकडे मोबाईलच नाहीत..!

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

डिचोलीतील बहुतेक सर्व शाळांमध्ये सध्या ऑनलाईन अध्ययन करण्यात येत आहे. ऑनलाईन शिक्षणाच्या निमित्ताने बहुतांश विद्यार्थ्यांच्या हाती मोबाईल आला असला, तरी डिचोलीतील काही विद्यार्थ्यांना मोबाईल मिळणे अवघड बनले आहे. सधन कुटुंबातील विद्यार्थ्यांना मोबाईल सहज उपलब्ध होतात, तर काही पालकांना आपल्या मुलांना मोबाईल देणे शक्‍य होत नाही.

डिचोली- मोबाईलच्या हट्टापायी वाळपई भागातील एका शाळकरी मुलाने जीवनाचा शेवट करण्याच्या घटनेने खळबळ उडून, अनेक पालक आणि शिक्षक व्यथित झाले आहेत. वाळपईतील या घटनेने ज्या पालकांना आपल्या पाल्यांना मोबाईल देणे शक्‍य होत नाही, त्या पालकांसमोरील चिंता निश्‍चितच वाढली आहे. वाळपईतील घटनेने यापूर्वी डिचोली तालुक्‍यात घडलेल्या घटनांच्या आठवणीही ताज्या झाल्या आहेत. डिचोली तालुक्‍यात आजही अनेक विद्यार्थी मोबाईलपासून वंचित आहेत. त्यामुळे मोबाईलपासून वंचित असलेल्या पालकांची झोप उडणे साहजिकच आहे.

ऑनलाईन शिक्षण ही आजच्या काळाची अत्यंत गरज बनली आहे. सध्या तर ‘कोविड’ संकटामुळे  शाळांतून आता ऑनलाईन अध्ययनावर भर देण्याची वेळ आली आहे. ऑनलाईन शिक्षण म्हटल्याबरोबर विद्यार्थ्यांच्या हाती मोबाईल द्यावाच लागत आहे. डिचोलीतील बहुतेक सर्व शाळांमध्ये सध्या ऑनलाईन अध्ययन करण्यात येत आहे. ऑनलाईन शिक्षणाच्या निमित्ताने बहुतांश विद्यार्थ्यांच्या हाती मोबाईल आला असला, तरी डिचोलीतील काही विद्यार्थ्यांना मोबाईल मिळणे अवघड बनले आहे. सधन कुटुंबातील विद्यार्थ्यांना मोबाईल सहज उपलब्ध होतात, तर काही पालकांना आपल्या मुलांना मोबाईल देणे शक्‍य होत नाही. तरीदेखील काही पालकांनी कर्ज घेवून शिक्षणासाठी मुलांना मोबाईल घेवून दिलेला आहे. काही पालकांना पैशांची बचत आणि पोट मारून भवितव्यासाठी कसेबसे करून मुलांच्या हाती मोबाईल देणे भाग पडले आहे. 

काही शाळांमध्ये चौकशी केली असता, डिचोलीत जवळपास २५ ते ३० टक्‍के विद्यार्थ्यांच्या हाती अद्याप मोबाईल आलेला नाही. ग्रामीण भागात ही समस्या जास्त जाणवत असली, तरी शहरातील राधाकृष्ण विद्यालयात तर हा प्रश्‍न गंभीर आहे. या विद्यालयात बहुतांश विद्यार्थी हे आर्थिकदृष्ट्या कमकुवत अशा मजूर कुटुंबातील आहेत. त्यामुळे या मुलांना मोबाईल देणे म्हणजे पालकांसमोर मोठा प्रश्‍न आहे. या विद्यालयात जवळपास ३५ ते ४० टक्‍के विद्यार्थ्यांच्या हाती अद्यापही मोबाईल आलेला नाही, अशी माहिती मिळालेली आहे. मोबाईल नसल्यामुळे हे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून लांब आहेत. पिळगाव आदी काही भागात तर रेंजची समस्या आहे. त्यामुळे अशा  भागात ऑनलाईन शिक्षण घेताना मुलांना मोठी अडचण निर्माण होत आहे. नेटवर्क मिळवण्यासाठी घरापासून लांब जावे लागते. त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. शिक्षणावरही परिणाम होत आहे. ज्या विद्यार्थ्यांना मोबाईल देणे पालकांना शक्‍य नाही. त्यांच्यासाठी शासकीय पातळीवरून प्रयत्न व्हायला हवेत किंवा सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा. मोबाईलचा वापर फक्‍त शिक्षणापुरताच मर्यादित ठेवावा. असा सूर बहुतेक पालक तसेच 

संबंधित बातम्या