उत्तरप्रदेशला ३००० प्रवासी श्रमिक रेल्वेने रवाना

Dainik Gomantak
गुरुवार, 21 मे 2020

दिल्ली ते तिरूअनंतपुरम या राजधानी एक्सप्रेस मधून मडगाव स्थानकावर १६ प्रवासी उतरले तर २२ प्रवासी केरळला गेले व तिरूअनंतपुरम ते दिल्ली या राजधानी एक्सप्रेस मधून ३८ प्रवासी मडगाव रेल्वे स्थानकावर उतरले व १०९ प्रवासी दिल्लीला गेले.

नावेली

मडगाव रेल्वे स्थानकावरून मडगाव ते लखनौ व मडगाव ते रायबरेली उत्तरप्रदेशसाठी दोन श्रमिक रेल्वे सोडण्यात आल्या सुमारे ३ हजार प्रवासी या रेल्वे मधून आपल्या गावी गेले.
दुपारी मडगाव ते लखनौ श्रमिक रेल्वे मधून १४६४ प्रवासी गेले तर सायंकाळी ७ वाजता मडगाव ते रायबरेली उत्तर प्रदेश श्रमिक रेल्वेतून १५२० प्रवासी गेले.
दरम्यान दिल्ली ते तिरूअनंतपुरम या राजधानी एक्सप्रेस मधून मडगाव स्थानकावर १६ प्रवासी उतरले तर २२ प्रवासी केरळला गेले व तिरूअनंतपुरम ते दिल्ली या राजधानी एक्सप्रेस मधून ३८ प्रवासी मडगाव रेल्वे स्थानकावर उतरले व १०९ प्रवासी दिल्लीला गेले अशी माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी दिली.
मडगाव हॉस्पिसीयो हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.आयरा आल्मेदा यांनी मडगावात रेल्वे मधून एक व विमानातून आलेला एक मिळून दोन कोविड १९ संशयित रुग्ण सापडल्याचे सांगितले.
मडगावात रेल्वे मधून प्रवाशांची तपासणी करून त्यांना क्वारंटाईन सेंटर मध्ये पाठवण्यात आले तर एकाला कोविड हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आले.

संबंधित बातम्या