गोव्यात 31 उमेदवार ठरले निवडणुकीपूर्वीच पंच

अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; आज होणार निवडणुकीचं चित्र स्पष्ट
 Panchayat Election
Panchayat Election Dainik Gomantak

पणजी : राज्यातील 186 पंचायतींच्या निवडणुकांची उमेदवारी अर्जांची छाननी आज झाली. दाखल केलेल्या अर्जांपैकी केवळ 14 अर्ज अवैध ठरले. तर 5723 उमेदवारी अर्ज वैध ठरले. छाननीनंतर 31 उमेदवार बिनविरोध निवडून आले. सासष्टी तालुक्यातील सर्वाधिक 9 तर डिचोली तालुक्यातील 5 उमेदवार बिनविरोध निवडून आले. याशिवाय केपेतील 2, पेडणेतील 2, तिसवाडीतील 3, सत्तरी तालुक्यातील 6, काणकोण तालुक्यातील 1 तर बार्देश तालुक्यातील 3 उमेदवार बिनविरोध निवडून आले.

या निवडणुकांमुळे अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली असून बुधवारी काही उमेदवार आपला अर्ज मागे घेतील तेव्हा सर्व चित्र स्पष्ट होईल. सध्या तरी सभापती रमेश तवडकर, विरोधी पक्षनेते मायकल लोबो, माजी माजी मंत्री दीपक पावसकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या राजकीय नेत्यांशी संबंधित उमेदवार पंचायत निवडणुकांमध्ये उतरले आहेत. निवडणूक आयोगाकडून आज झालेल्या उमेदवारी अर्ज छाननीमध्ये बार्देशमधून 5, फोंड्यामधून 3, सत्तरीमधून 2 तर पेडणे, डिचोली, तिसवाडी आणि सासष्टीमधून प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज अवैध ठरले.

 Panchayat Election
बांधकाम नियमितीकरणाचे 90 टक्के अर्ज निर्णयाविना

सर्वाधिक उमेदवारी अर्ज बार्देश तालुक्यातून 1142 वैध ठरले आहेत. तर केपे तालुक्यातील 11 पंचायतींसाठी 283 अर्ज व काणकोणच्या 7 पंचायतींसाठी 201 अर्ज वैध ठरले आहेत.

10 ऑगस्टला शासकीय सुटी

10 ऑगस्ट रोजी राज्यातल्या 186 पंचायतींसाठी मतदान होत आहे. या दिवशी राज्य सरकारने शासकीय सुटी जाहीर केली आहे. तर खासगी संस्थेतील कर्मचाऱ्यांना पगारी सुटी मिळणार आहे. पंचायत निवडणुकीत मतदारांना मतदान करता यावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com