गोव्यातील 31 कॅसिनो कामगार कोरोना पॉझिटीव्ह

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मार्च 2021

मंडोवी येथील एक ऑफशोअर कॅसिनो कोविडचे रेड झोन केंद्र बनले आहे, कारण गुरुवारी 31 कॅसिनो कामगारांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे.

पणजी: मंडोवी येथील एक ऑफशोअर कॅसिनो कोविडचे रेड झोन केंद्र बनले आहे, कारण गुरुवारी 31 कॅसिनो कामगारांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. गोवा आरोग्य विभागाने उत्तर गोवा जिल्हा प्रशासनाला हे क्षेत्र सूक्ष्म कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्याचे आणि त्या जागेवर शिक्कामोर्तब करण्याचा सल्ला दिला. मात्र गुरुवारी पहाटे ही प्रकरणे उघडकीस आल्यापासून अजूनही अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. 

उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अजित रॉय यांना पेडणेच्या सलाई विभागाला क्वारंटाइन संकुल घोषित करण्यास सांगितले. गुरुवारी गोव्यामध्ये 189 ताज्या कोविड रुग्णांची नोंद झाली असून ती तीन महिन्यांतील सर्वाधिक आहे आणि पणजी शहरी आरोग्य केंद्राची सक्रिय संख्या  163 वर पोहचली आहे. 

गोवा दिल्लीच्याही पुढे; गोव्यातील तरुण नाही, तर मुलंही दारू पिऊ शकतात! 

राज्य आरोग्य रोग विशेषज्ञ प्रभारी डॉ. उत्कर्ष बेटोडकर (आयडीएसपी) यांनी रॉय यांना आधी कॅसिनोचा परिसर मायक्रो कंटेनमेंट झोन घोषित करावा व त्यावर शिक्कामोर्तब करण्याचा सल्ला दिला होता. गेल्या आठवड्यात राजधानीतील एका लोकप्रिय रेस्टॉरंटमधील काही कर्मचार्‍यांनी कोरोना चाचणी केल्यानंतर ती पॉझिटिव्ह आली. रॉय यांनी त्याला मायक्रो कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केले होते आणि तत्काळ त्याच्या जागेवर शिक्कामोर्तब केले होते. मात्र असे कसिनो बाबतीत झाले नाही.

आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी गेल्या आठवड्यात असा इशारा दिला होता की हॉटेल आणि रेस्टॉरंट्सने कोविड प्रोटोकॉलचे पालन न केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. त्यांनी असेही सुचवले होते की शेजारच्या राज्यांमधील वाढती प्रकरणे लक्षात घेता गोव्यातही येणाऱ्या सर्व पर्यटकांकडून कोविड नकारात्मक प्रमाणपत्र घेण्याचे सुचवले होते. परंतु मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोव्यातील पर्यटकांसाठी कोणत्याही प्रकारचा अंकुश किंवा चाचण्या करणे  नाकारले आहे. मात्र, पर्यटक व स्थानिक जनतेला सर्व प्रोटोकॉलचे पालन करण्याचे व सतर्क राहण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

संबंधित बातम्या