३१ पंचायतींचे डिजिटायझेशन रखडले!

31 Panchayats still waiting for digitization
31 Panchayats still waiting for digitization

पणजी : राज्यातील पंचायतींचे डिजिटायझेशन करून त्यांचे स्वतःचे संकेतस्थळ निर्माण करण्याचे काम १९१ पैकी १६० पंचायतींनी पूर्ण केले आहे. जुलै २०१६ पासून सुरू झालेल्या या उपक्रमांतर्गत ३१ पंचायतींचे संकेतस्थळ निर्माण होऊ शकले नाही. विशेष बाब म्हणजे राजधानी पणजी शहराला लागून असलेल्या ताळगाव, सांताक्रूझ पंचायतींचा त्यात समावेश आहे. 

राज्य सरकारच्या पंचायत संचालनालयाच्या संकेतस्थळावर ही माहिती उपलब्ध आहे. २०१६ मध्ये पंचायतराज आणि सामुदायिक विकास या उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व ग्रामपंचायतींचे डिजिटायझेशन करण्यात आले. तिसवाडी तालुक्याचाच विचार केला तर १८ पंचायतींपैकी केवळ सहा पंचायतींचेच संकेतस्थळ निर्माण झाले आहे. ताळगाव, सांताक्रूझ, त्याशिवाय अधिक लोकसंख्या असलेल्या करमळी, कुंभारजुवे पंचायतींनी अद्याप आपले संकेतस्थळ निर्माण केले नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. 

विविध पंचायतींच्या संकेतस्थळांची यादी पंचायत संचालनालयाने दिली आहे, त्यात ११ ब्लॉक दिलेले आहेत. त्या-त्या ब्लॉकमध्ये पंचायतींच्या संकेतस्थळांची नावे देण्यात आली आहेत. राज्य सरकारच्या आदेशान्वये पंचायतींची संकेतस्थळे मात्र त्या-त्या पंचायतींनी अपडेट केलेली दिसतात. १९१ पंचायतींपैकी १६० पंचायतींनी संकेतस्थळे निर्माण करून अद्ययावतीकरणात पाऊल टाकले आहे. टेक्नोसेव्ही होण्याचे पंचायतींचे स्वप्न पूर्ण झाल्याचे दिसत असले तरी ३१ पंचायतींनी अद्याप त्याकडे का पाठ फिरविली, हाही एक प्रश्‍न आहे. तिसवाडी, धारबांदोडा आणि सांगे ब्लॉकमध्ये अनुक्रमे ६, ५ व ७ पंचायतींचीच संकेतस्थळे झाल्याची दिसतात. सर्वाधिक ३० पंचायतींची संकेतस्थळे सासष्टी ब्लॉकमध्ये आहेत. त्याच्यापाठोपाठ बार्देश (२३), पेडणे (२०) या ब्लॉकचा क्रमांक लागतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com