Margao Municipal Corporation elections : 32 उमेदवारांकडून अर्ज दाखल 

 Margao Municipal Corporation elections : 32 उमेदवारांकडून अर्ज दाखल 
Margao Municipal Corporation elections

मडगाव : मडगाव पालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या आज चौथ्या दिवशी  32 उमेदवारांनी 35 उमेदवारी अर्ज दाखल केले. छाननीत तांत्रीक कारणामुळे अर्ज बाद होऊ नये याची काळजी घेताना तीन उमेदवारांनी प्रत्येकी दोन अर्ज सादर केले. (32 candidates filed nominations for Madgaon Municipal Corporation elections)

गोवा फाॅरवर्डच्या फातोर्डा फाॅरवर्ड पॅनलच्या 13 उमेदवारांनी आज अर्ज सादर केला. मावळत्या नगराध्यक्ष पुजा नाईक, मावळते नगरसेवक लिंडन परेरा, राजू (हाॅडली) शिरोडकर, अ‍ॅजेलिस परेरा यांच्यासह माजी नगरसेवक रामदास हजारे, राजू नाईक यांनी आज उमेदवारी अर्ज भरले. भाजपचे मावळते नगरसेवक केतन कुरतकर यांच्या भगिनी सुशांता कुरतरकर यांनी भाजपच्या वायब्रंट मडगाव पॅनलतर्फे प्रभाग 13 मधून उमेदवारी अर्ज दाखल केला.  

प्रभाग 1 जोआन्स फ्रान्सिस आग्नेलो , प्रभाग 2 कालिदास नाईक, जाॅनी क्रास्टो, प्रभाग 3 लिंडन परेरा, रेश्मा सय्यद, प्रभाग 4 पुजा नाईक, प्रभाग 5 दीपश्री कुर्डीकर, श्वेता सुजय लोटलीकर, प्रभाग 6 प्रविण जना नाईक, प्रभाग 7 मिलाग्रीना गोम्स, कुस्तोदियो डायस, मिलशाॅन डायस, प्रभाग 8 मिलाग्र (मिलू) नोरोन्हा, प्रभाद 9 महादेव (रामदास) हजारे, रविंद्र (राजू) नाईक, नर्मदा विदेश कुंडईकर, प्रभाग 10 वितोरिनो तावारीस, प्रभाग 11 राजू नाईक, अॅेजेलीस परेरा, राजीव रवाणे, प्रभाग 12 व्लेम फर्नांडिस, प्रभाग 13 सुशांता कुरतरकर, प्रभाग 14 रोनिता राजेंद्र आजगावकर,  प्रभाग 16 अनिशा मोहन नाईक, प्रभाग 19 मंगला विठ्ठल हरमलकर, प्रभाग 21 दामोदर (सचिन) सातार्डेकर, प्रभाग 23 निमिशा फालेरो, प्रभाग 24 रेश्मा राजू शिरोडकर, राजू (हॅडली) शिरोडकर, प्रतिक वासुदेव परब, प्रभाग 25 आस्मा सय्यद 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com