Sting Operation: गोव्यात RT-PCRसाठी उकळतात तब्बल 3200 रुपये

गोव्यात ‘आरटीपीसीआर’साठी रुग्णालयांकडून लूट सुरू
3200 Rs will be charged for RT PCR test in Goa
3200 Rs will be charged for RT PCR test in Goa Dainik Gomantak

मडगाव: गोव्यात कोविडचे (Goa Covid Updates) रुग्ण वाढलेले असताना सरकारी केंद्रे चाचण्यासाठी अपुरी पडू लागली आहेत. या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयांनी रुग्णांची लूटमार करणे सुरू केली आहे. आरटीपीसीआर (RT-PCR) चाचणीसाठी सरकारने 500 रुपये ही कमाल मर्यादा ठेवली आहे. मात्र, खासगी रुग्णालयात सर्रासपणे या चाचणीसाठी अजूनही 1400 ते 1500 रुपये वसूल केले जातात. काही मोठ्या रुग्णालयात तर हा 3200 रुपयेही उकळले जातात.

सध्या दर दिवशी हजारो लोक कोविडबाधित होत असून सध्या ''फ्ल्यू''चाही प्रसार चालू झाल्याने लोक तापाने फणफणत अजून सरकारी तपासणी केंद्रात गर्दी वाढू लागल्याने लोक नाइलाजाने खासगी इस्पितळात चाचणी करून घेऊ लागले आहेत. मात्र यातून रुग्णांची लूट होत असल्याचे समोर आले आहे. ''गोमन्तक''ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये ही बाब पुराव्यासह उघड झाली आहे. मडगाव येथील व्हिक्टर इस्पितळात यासंबंधी फोन करून माहिती घेतली. यावेळी प्राप्ती नावाच्या महिलेने आरटीपीसीआर चाचणीसाठी 1400 रुपये तर अँटीजन चाचणीसाठी 250 रुपये शुल्क आकारण्यात येत असल्याचे सांगितले.

3200 Rs will be charged for RT PCR test in Goa
अनमोडमधून गोव्यातील वाहनं परत पाठवली

तर फोंडा येथील एका खाजगी लॅबमध्ये चाचणीसाठी 1500 रुपये आकारले जात असून मडगावातीळ अन्य खासगी प्रयोगशाळांतही हाच रेट चालू आहे. गोवा सरकारने एक परिपत्रक जारी करून आरटीपीएसीआर चाचणीसाठी 500 रुपये तर अँटिजनसाठी 250 रुपये हा दर ठरविला आहे. तरीही रुग्णालये नियमबाह्य पद्धतीने रुग्णांची लूट करत असल्याचे दिसत आहे.

3200 Rs will be charged for RT PCR test in Goa
गोव्यात गेल्या 24 तासात 3145 कोविड रुग्ण, पॉझिटिव्ह दर 39.1% वर

आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज

सध्या राज्य प्रशासन निवडणुकांच्या कामामध्ये व्यस्त आहे. तर दुसरीकडे कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना चाचणीसाठी राज्य सरकारने चाचणीची किंमत अकारण्यावरती मर्यादा घालून दिली असेल तरीही अनेक खाजगी रुग्णालयांमध्ये हा दर दीड हजारांपासून तर 3200 रुपये आकारले जात आहेत. याबाबत प्रशासनाने योग्य ती निर्देश देणे गरजेचे आहे. त्यामुळे रुग्णांची लुबाडणूक होणार नाही. याशिवाय कोणत्या ठिकाणी ही चाचणी उपलब्ध आहे याची माहिती देणे आवश्यक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com