मुरगाव तालुक्यातील चारही मतदारसंघातून 'हे' 33 उमेदवार रिंगणात

39 उमेदवारांपैकी 6 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले
Mormugao candidates
Mormugao candidatesDainik gomantak

मुरगाव तालुक्यातील चारही मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीसाठी त्यातील उमेदवारांची निश्चिती झाली आहे. उमेदवारी मागे घेण्याच्या दिवशी 39 उमेदवारांपैकी 6 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. विधानसभा निवडणुकीसाठी भरण्यात आलेल्या नामांकन अर्जाची छाननी प्रक्रिया निवडणूक आयोगाकडून (Election Commission) पार पाडल्यानंतर मुरगाव तालुक्यातून चारही मतदारसंघातून भरण्यात आलेल्या अर्जापैकी 39 अर्ज ग्राह्य धरण्यात आले होते. दरम्यान काल अर्ज मागे घेण्याच्या दिवशी 6 अर्ज मागे घेण्यात आल्याने आता एकूण 33 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार हे निश्‍चित झाले आहे.

काँग्रेस, भाजप, आम आदमी पक्ष, मगो, तृणमूल काँग्रेस, गोवा फॉरवर्ड यांच्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात आले असून, अपेक्षित अशा लढती जवळपास निश्चित आहे. उमेदवारांनी खबरदारी म्हणून एकापेक्षा जास्त अर्ज भरले होते, तसेच काही डमी अर्जही भरण्यात आले होते. यातील काही अर्ज फेटाळण्यात आले, तर काही अर्ज ग्राह्य ठरले होते. दरम्यान काल या ग्राह्य अर्जा पैकी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी 39 उमेदवारांपैकी 6 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यानुसार एकूण मुरगाव तालुक्यातील चारही मतदार संघातून 33 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार हे अंतिम यादीतून स्पष्ट झाले आहे.

Mormugao candidates
पणजीच्या हाय-प्रोफाईल लढाईत, भाजपची ताकद पणाला

यात कुठ्ठाळी मतदारसंघातून अर्ज छाननीनंतर ग्राह्य धरण्यात आलेल्या १२ अर्जा पैकी फातिमा फुर्तादो, मेर्मियाना वाझ, शरण मेट्टी (सर्व अपक्ष) या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले असून, आता नारायण नाईक (भाजप- कमळ), गिल्बर्ट मारियानो रॉड्रिगीस (तृणमूल काँग्रेस (TMC) - फुल व गवत), एलिना साल्ढाणा (आप- झाडू), भक्ती खडपकर (शिवसेना- धनुष्य), तेवेतोनियो कॉस्ता (रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टी- फुटबॉल), अंतोनिओ वाझ (अपक्ष- कपाट), गिरीश पिल्ले (अपक्ष) विशाल नाईक (अपक्ष) आदी उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार आहे.

दाबोळी मतदारसंघातून अर्ज छाननीनंतर ग्राह्य धरण्यात आलेल्या 8 जागांपैकी संजिता पेरनिम या अपक्ष उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतला. तर आता माविन गुदिन्हो (भाजप- कमळ), कॅप्टन विरियातो फर्नांडिस (काँग्रेस- हात), जोस फिलीप डिसोझा (राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी- घड्याळ), महेश भंडारी (तृणमूल काँग्रेस- फुल व गवत), गजानन बोरकर रिव्होल्यूशनरी गोवन्स- फुटबॉल) प्रेमानंद नानोस्कर (आप- झाडू), तारा केरकर (अपक्ष) उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार आहे.

मुरगाव (Mormugao) मतदारसंघातून अर्ज छाननी नंतर ग्राह्य धरण्यात आलेल्या 9 अर्जा पैकी गोपाळ कांबळी या अपक्ष उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतला असून आता या मतदार संघात एकूण 8 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार हे निश्‍चित झाले आहे. यात जयेश शेटगावकर (तृणमूल काँग्रेस- फुलं व गवत), मिलिंद नाईक (भाजप- कमळ), संकल्प आमोणकर (काँग्रेस- हात), शेख अकबर (राष्ट्रवादी काँग्रेस- घड्याळ), परशुराम सोनूर्लेकर (आप- झाडू), परेश तोरस्कर (रिव्होल्यूनरी गोवन्स- फुटबॉल) इनायतुला खान (अपक्ष) आदी उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

वास्को मतदारसंघातून एकूण 10 ग्राह्य अर्जापैकी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी लोरेटा श्रीधरन या अपक्ष उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतला. आता कृष्णा साळकर (भाजप- कमळ), कार्लुस आल्मेदा (काँग्रेस- हात) सैफुल्ला खान (तृणमूल काँग्रेस- फुल व गवत) आंद्रे व्हिएगस ( रिव्होल्यूशनरी गोवन्स- फुटबॉल), मारुती शिरगावकर (शिवसेना- धनुष्य), सुनील लोरान (आप- झाडू), संदीप शेट्ये (जय महाभारत पार्टी-), अड्र्यू डिकुन्हा (अपक्ष) चंद्रशेखर वस्त (अपक्ष) आदी उमेदवार निवडणूक (Election) रिंगणात आहेत.

Mormugao candidates
मतभेद मिटले, रोयोलांचा टोनींना पाठिंबा

दरम्यान, मुरगाव तालुक्यातील चारही मतदार संघातून 10 नवीन उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. कुठ्ठाळी मतदार संघातून सांकवाळचे सरपंच गिरीश पिल्ले (अपक्ष) तियोतिनो कॉस्ता ( रिव्होल्यूशनरी गोवन्स), सांकवाळचे पंच सदस्य नारायण नाईक (भाजप) आणि विशाल नाईक (अपक्ष) या चार नवख्या उमेदवारांचा समावेश आहे. दाबोळी मतदारसंघातून कॅप्टन विरियातो फर्नांडिस (काँग्रेस) आणि गजानन (गौरीश) बोरकर (रिव्होल्यूशनरी गोवन्स) दोन नवीन चेहरे निवडणुकीत रिंगणात उतरणार आहे.

वास्को मतदारसंघातून आंद्रे व्हिएगस (रिव्होल्यूशनरी गोवन्स) आणि मारुती शिरगावकर (शिवसेना) हे नवीन चेहरे आपले नशीब आजमावणार आहे. मुरगाव मतदार संघात निलेश नावेलकर (अपक्ष), जयेश शेटगावकर (तृणमूल काँग्रेस), इनायत खान (अपक्ष) हे तीन नवीन उमेदवार निवडणुकीसाठी सज्ज झाले आहे.

दरम्यान काल विधानसभा निवडणुकीसाठी मुरगाव तालुक्यातील चारही मतदारसंघातील उमेदवारी अंतिम यादी जाहीर झाली. त्यानुसार प्रत्येक उमेदवारांनी आपला प्रचार कार्याला जोरकसपणे सुरुवात केली आहे. प्रत्येक घर प्रभाग पायदळी तुडवून उमेदवार आपल्या मतदारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करीत आहे. याकामी त्यांच्या कार्यकर्त्यांनीही प्रयत्नांची पराकाष्टा चालू ठेवली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com