गोवा विद्यापीठाचा 33 वा पदवीदान समारंभ उत्साहात

गोव्यातील विद्यार्थ्यांचे कौशल्य वाढविण्यासाठी गोवेकरांनी हातभार लावला
33 Graduation ceremony
33 Graduation ceremony Dainik Gomantak

Goa University: चा 33 वा पदवीदान समारंभ आज शुक्रवारी दिनांक 26 ऑगस्ट रोजी पार पडला. दोन वर्षांच्या कालावधीनंतर या दीक्षांत समारंभाताचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभात 11028 पदवीधरांना पदवी प्रदान करण्यात आल्या.

(33rd graduation ceremony of Goa University concluded with enthusiasm)

33 Graduation ceremony
Verna to Mormugao NH: कामकाजाची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

1546 पदवीधरांना पदव्युत्तर पदवी आणि 67 विद्यार्थ्यांना डॉक्टरेटची पदवी प्रदान करण्यात आली. याशिवाय 149 जणांनी पदव्युत्तर पदविका प्राप्त केल्या आहेत. तसेच 71 विद्यार्थ्यांना सुवर्णपदके, 73 विद्यार्थ्यांना बक्षिसे आणि गुणवत्ता शिष्यवृत्ती मिळाल्या या दैदिप्यमान यशाने विद्यार्थ्यांनी जणू विद्यापीठाची मान अभिमानाने उंचावली आहे.

या कार्यक्रमास न्यायालयाचे सदस्य आणि गोवा विध्यापिठाच्या इतर संस्था, डीन, प्राध्यापक, महाविद्यालयांचे प्राचार्य, पदवी प्राप्तकर्ते, पुरस्कार विजेते, पालक, विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आरंभी गोवा विध्यापिठाचे कुलगुरू, प्रा. हरिलाल बी. मेनन यांनी आपल्या स्वागतपर भाषणात या संमारंभास उपस्थितांना संबोधित केले.

33 Graduation ceremony
Goa Corona Update: दोन दिवसांत दोन कोरोना रूग्णांचा मृत्यू, आज 127 रूग्णांची नोंद

यावेळी ते बोलताना मेनन म्हणाले की, जीवनात ध्येय गाठताना कौशल्य आत्मसात केलेल्यास ध्येयापर्यंत पोहोचण्याचा प्रवास अधिक सोपा होतो. म्हणून ध्येय गाठण्यासाठी आपण त्यासाठीची कौशल्य ही आत्मसात केली पाहिजेत असे ते म्हणाले. या कार्यक्रमास उपस्थित विद्यार्थी, पालक, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ यांनी ही या कार्यक्रमास हजेरी लावली.

मेनन यांनी गोवा विद्यापीठाच्या कामगिरीबाबत बोलताना सांगितले की, गोव्यातील विद्यार्थ्यांचे कौशल्य वाढविण्यासाठी सर्व उद्योग संघटना, चेंबर्स ऑफ कॉमर्स आणि कॉर्पोरेट संस्थांसोबत काम करण्यासाठी सुरु असलेल्या कार्य लक्षणिय आहे. तसेच भारत सरकारच्या 'उन्नत भारत अभियान' अंतर्गत गोवा विध्यापिठाने उत्तर गोव्यातील तीन गावे आणि दक्षिण गोव्यातील दोन गावे दत्तक घेतली आहेत. याच कौतूक माहिती दिली आणि या भागातील रहिवाशांना लाभ मिळवून देणारे सागरी शेती उपक्रम यासारखे उपक्रम करीत असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमास गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच कुलगुरू, हरिलाल मेनन यांनी राजभवन, डोना पॉला येथे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला हजेरी लावली. शिक्षण सचिव श्री. रवी धवन, आयएएस, प्रधान सचिव (वित्त) डॉ. व्ही. कॅंडवेलू, आयएएस, आमदार श्री. गणेश गावकर आदी उपस्थित होते.विद्यापीठातील इतर मान्यवर उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com