चोवीस तासांत ३४८ पॉझिटिव्‍ह

Tejshri Kumbhar
गुरुवार, 6 ऑगस्ट 2020

राज्यात कोरोनाचा हाहाकार सुरूच आहे. मागील २४ तासांत आतापर्यंत सर्वाधिक ३४८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. तसेच चार कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. कोविड मृतांची संख्या ६४ पर्यंत पोहोचली आहे. गोवा आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार १७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात २०७२ एवढे कोरोनाबाधित रुग्‍ण आहेत.

तेजश्री कुंभार

पणजी :

राज्यात कोरोनाचा हाहाकार सुरूच आहे. मागील २४ तासांत आतापर्यंत सर्वाधिक ३४८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. तसेच चार कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. कोविड मृतांची संख्या ६४ पर्यंत पोहोचली आहे. गोवा आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार १७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात २०७२ एवढे कोरोनाबाधित रुग्‍ण आहेत.
दरम्यान, ज्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला, त्यांच्यामध्ये खांडोळा - माशेल येथील ७१ वर्षीय महिला, फर्मागुडी फोंडा येथील ६३ वर्षीय पुरुष, डिचोली येथील ६५ वर्षीय पुरुष, पर्वरी येथील ७९ वर्षीय महिला यांचा मृत्यू झाला. पर्वरी येथील महिलेचा मृत्यू गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात झालेला असून बाकीच्या तिघांचा मृत्यू कोविड इस्पितळात झाला आहे.
आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार आजच्या दिवशी हॉस्पिटल आयसोलेशनमध्ये ७२ जणांना ठेवण्यात आले. १९९१ जणांच्‍या लाळेचे नमुने घेण्यात आले, तर १८११ जणांचे अहवाल देण्‍यात आले आहेत. दरम्यान, रेल्‍वे, विमान आणि रस्तामार्गे आलेले १३ रुग्ण आहेत. डिचोली आरोग्य केंद्रात १२ रुग्ण, साखळी आरोग्य केंद्रात ६३ रुग्ण, पेडणे आरोग्य केंद्रात ३६ रुग्ण, वाळपई आरोग्य केंद्रात ६७ रुग्ण, म्हापसा आरोग्य केंद्रात ६८ रुग्ण, पणजी आरोग्य केंद्रात ८५ रुग्ण, बेतकी आरोग्य केंद्रात १७ रुग्ण, कांदोळी आरोग्य केंद्रात ५५ रुग्ण, कोलवाळ आरोग्य केंद्रात ४२ रुग्ण, खोर्ली आरोग्य केंद्रात ४३ रुग्ण, चिंबल आरोग्य केंद्रात ९० रुग्ण, पर्वरी आरोग्य केंद्रात ५३ रुग्ण, कुडचडे आरोग्य केंद्रात ३१ रुग्ण, काणकोण आरोग्य केंद्रात १४ रुग्ण, मडगाव आरोग्य केंद्रात १३६ रुग्ण, वास्को आरोग्य केंद्रात ३९८ रुग्ण, लोटली आरोग्य केंद्रात ३४ रुग्ण, मेरशी आरोग्य केंद्रात २८ रुग्ण, केपे आरोग्य केंद्रात ३७ रुग्ण, शिरोडा आरोग्य केंद्रात ४१ रुग्ण, धारबांदोडा आरोग्य केंद्रात ३५ रुग्ण, फोंडा आरोग्य केंद्रात १२५ रुग्ण आणि नावेली आरोग्य केंद्रात ४६ रुग्ण आणि राज्यात इतर ठिकाणीही रुग्ण आढळल्‍याची माहिती आरोग्य खात्याने दिली.

 

संपादन : महेश तांडेल

संबंधित बातम्या