साळगावकर क्लबच्या 36 वर्षीय माजी खेळाडूचे निधन

साळगावकर क्लबच्या 36 वर्षीय माजी खेळाडूचे निधन
Rahul Kumar.jpg

पणजी: गोव्याच्या (goa) साळगावकर एफसीचे (FC) सुमारे पाच मोसम प्रतिनिधित्व केलेला चंडीगड येथील फुटबॉलपटू (Football) राहुल कुमार (Rahul Kumar) याचे अकाली निधन झाले. मृत्यूसमयी राहुल 36 वर्षांचा होता. प्राप्त माहितीनुसार, तो यकृताच्या आजाराने त्रस्त होता आणि मृत्यूसमयी कोरोना विषाणू बाधित होता. (A 36-year-old former player of Salgaonkar Club has passed away)

राहुल कुमार पंजाबी खेळाडूने व्यावसायिक फुटबॉल कारकिर्दीची पुणे एफसीतर्फे 2009-10 मोसमात सुरवात केली. त्यानंतर तो कोलकात्यात मोहन बागान, युनायटेड स्पोर्टस क्लबतर्फे आय-लीग स्पर्धेत खेळला. काही काळ त्याने कोलकात्यातील मोहम्मेडन स्पोर्टिंग क्लबचेही प्रतिनिधित्व केले. 

राहुल 2011 ते 2016 या कालावधीत साळगावकर एफसी संघाशी करारबद्ध होता. तो मध्यफळीत, तसेच बचावफळीतही खेळायचा. गोव्यातील या मातब्बर संघातर्फे तो आय-लीग, फेडरेशन कप, ड्युरँड कप स्पर्धेसह एएफसी कप स्पर्धेतही खेळला. त्यानंतर दोन मोसम तो चर्चिल ब्रदर्सतर्फे आय-लीग स्पर्धेत खेळला. डिसेंबर 2017 नंतर त्याने एकाही संघाचे प्रतिनिधित्व केले नाही. प्रकृतीच्या कारणास्तव तो फुटबॉल मैदानापासून दूर केला.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com