कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोव्यात येणारी 38 विमाने रद्द

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोव्यात येणारी 38 विमाने रद्द
flights cancle due to corona virus

दिल्ली, महाराष्ट्र, राजस्थान आणि इतर अनेक राज्यांनी लॉकडाऊन आणि रात्रीचे कर्फ्यू लादल्यामुळे विमान कंपन्यांना त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय) च्या मते, रविवारी गोव्यासाठी येणारी 33 उड्डाणे रद्द करण्यात आली आणि सोमवारी 38 उड्डाणे रद्द करण्यात आली. अनेक राज्यांनी लादलेल्या निर्बंधांमुळे बऱ्याच प्रवाशांना, विशेषत: कुटूंबियांना त्यांचा प्रवास रद्द करण्यास विमान कंपन्यांनी प्रवृत्त  केले आहे. गोवा विमानतळ संचालक गगन मलिक यांना येत्या काही दिवसांत विमान कंपन्यांनी मेट्रो शहरातून गोव्याला जाणाऱ्यांची उड्डाणे कमी करण्याची अपेक्षा केली आहे. (38 flights to Goa canceled due to corona)

रविवारी राज्यात 33 उड्डाणे रद्द करण्यात आली. कारण, दर आठवड्याच्या शेवटी (विकेंड) गोव्यात 11,000 प्रवाशी येत असतात. परंतू या विकेंडला फक्त 3000 प्रवाशी गोव्यात दाखल झाले. आठवड्याच्या दिवशी (विकडे) दररोज किमान 9,000 प्रवासी गोव्यात दाखल होतात असे गगन मलिक म्हणाले. दिल्लीतील वाढत्या कोरोना रुग्णामुळे  दिल्ली सरकारने आठवडाभर लॉकडाऊन जाहीर केले आहे. महाराष्ट्रानेही संचारबंदी सारखी बंधने लावली आहेत. केरळ, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि तामिळनाडू या राज्यांत देखील बंधने लावण्यात आली आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि राजस्थान यांसारख्या 10 राज्यामध्ये 78.6 टक्के कोरोना रुग्ण आहेत. तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात, केरळ, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड ही यादीतील इतर राज्ये आहेत. एअरलाइन्स उद्योगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोव्याला जाण्यासाठी बहुतेक उड्डाणे मेट्रो शहरातील होती. तिथेच कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे.  सरकारने उड्डाणांवर कोणतेही बंधन घातलेले नसले तरी  अनेक पायलट रात्रीच्या वेळी जेथे रात्री कर्फ्यू लावण्यात आले आहेत तेथे उड्डाण घेण्यास टाळाटाळ करतात . अनेक राज्यांनी निर्बंध लावल्यामुळे गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी झाली आहे, 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com