आयपीएल ‘बेटिंग’प्रकरणी चौघांना अटक

1.25 लाख रोकड जप्त; पर्वरीत पोलिसांचा हॉटेलवर छापा
IPL Betting Case in Goa
IPL Betting Case in Goa

पणजी : सध्या देशात आयपीएल क्रिकेट प्रीमियर लिग स्पर्धा अंतिम टप्प्यात असल्याने मोठ्या प्रमाणात गोव्यातून बेटिंग सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर क्राईम ब्रँचने काल रात्री उशिरा पर्वरीतील एका नामांकित हॉटेलवर छापा टाकून चारजणांना बेटिंग व जुगारप्रकरणी अटक केली. त्यांच्याकडून 1.25 लाखांच्या रोख रक्कम आणि 60 हजारांचे बेटिंगसाठी वापरण्यात आलेले साहित्य जप्त केल्याची माहिती पोलिस निरीक्षक राहुल परब यांनी दिली.

या छाप्यावेळी पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये सुनील संतोष धुंका (37 वर्षे), विजय सुनील मोतिजा (२७ वर्षे), हिरो सजनदास उदासी (37 वर्षे) व अनिल हसमतराय रोचनी (51 वर्षे) यांचा समावेश असून हे सर्वजण ठाणे - महाराष्ट्र येथील रहिवाशी आहे. बेटींग तसेच जुगारसाठी वापरलेले लॅपटॉप, मोबाईल्स पोलिसांनी जप्त केले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील गुजरात टायटन व राजस्थान रॉयल्स या दोन संघामध्ये क्रिकेट सामना सुरू असताना संशयित देशातील तसेच परदेशातील विविध भागामधून ऑनलाईन बेटींग स्वीकारत होते. निरीक्षक राहुल परब यांच्या पथकाने ही कारवाई केली.

आयपीएल क्रिकेट प्रिमीयर लिग स्पर्धा सुरू झाल्यानंतर बेटिंग व्यवहारासाठी अनेकजण गोव्यातील हॉटेलात खोली आरक्षित करून हा बेटिंगचा जुगार खेळत आहेत. ही स्पर्धा सुरू झाली तेव्हा कळंगुट तसेच पर्वरी पोलिसांनीही या स्पर्धेतील बेटिंगप्रकरणी काही हॉटेलवर छापा टाकून या बेटिंगबुकींना अटक केली होती. त्यामुळे काहींनी आपले बस्थान गोव्यातून हलविले होते. ही स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात असून क्रिकेट सामन्यावर बेटिंग लावणारे अनेकजण आहेत. गोवा हे पर्यटन स्थळ असल्याने व हॉटेलमध्ये बेटिंगचा व्यवहार करणे सहज सोपे असल्याने बेटिंगबुकी गोवा हे ठिकाण निवडतात अशी माहिती पोलिसांनी दिली.

IPL Betting Case in Goa
गोव्यात 32 पोलीस उपअधीक्षकांच्या बदल्या

साध्या वेशात पोलिस

येत्या काही दिवसांत या क्रिकेट सामन्यांच्या बेटिंगसाठी मोठ्या उलाढाली होण्याची शक्यता असल्याने हॉटेलचालकांना असे बेटिंगबुकी आढळून आल्यास त्याची माहिती त्वरित पोलिसांना देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. जिल्हा तसेच क्राईम ब्रँचच्या पोलिसांनी या बेटिंग जुगारवर लक्ष ठेवण्यासाठी साध्या वेशातील पोलिसांवर ही कामगिरी सोपविण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलिसांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com