गोव्‍यात कोरोनामुळे चौथा मृत्‍यू

dainik gomantak
बुधवार, 1 जुलै 2020

लोकांच्‍यात मात्र यामुळे भीतीचे वातावरण पसरलेले आहे.

पणजी, 
राज्‍यात कोरोनामुळे चौथा मृत्यू झाला आहे. व्‍यक्‍ती ताळगाव येथील असून ६४ वर्षीय पुरूष आहे. गेल्‍या काही दिवसांपुर्वी हि व्‍यक्‍ती कोरोना पॉझिटिव्‍ह आढळल्‍याने कोविड रूग्‍णालयात उपचार सुरू होते.  
दरम्‍यान काही दिवसांपुर्वी राज्‍यात कोरोनामुळे तीन मृत्‍यू झाले होते. संबंधित मृत व्‍यक्‍तीचे अंत्‍यसंस्‍कार कोठे करण्‍यात येणार याबाबत कोणत्‍याही प्रकारची माहिती अद्याप देण्‍यात आलेली नाही. लोकांच्‍यात मात्र यामुळे भीतीचे वातावरण पसरलेले आहे.

संबंधित बातम्या