मलमूत्र तोडग्यासाठी मडगाव पालिकेला 4 आठवडे मुदत

गटारातील मलमुत्र तोडग्यासाठी मडगाव पालिकेला 4 आठवड्यांची मुदत
मलमूत्र तोडग्यासाठी मडगाव पालिकेला 4 आठवडे मुदत
Dainik Gomantak

मडगाव: गटारांत सोडल्या जाणाऱ्या मलमूत्र प्रश्नावर तोडगा काढण्‍यासाठी उच्च न्यायालयाने मडगाव नगरपालिकेला चार आठवड्यांची मुदत दिली आहे. पंचायतीने गांभीर्याने पावले उचलल्‍यास हे मलमूत्र शेतात व तळ्यात वाहून जाण्याचे प्रकार बंद होणार आहेत.

(4 weeks deadline for excreta disposal for margao municipal council)

मलमूत्र तोडग्यासाठी मडगाव पालिकेला 4 आठवडे मुदत
गोवेकरांच्या चिंतेत भर; राज्यात कोरोना रूग्णसंख्येचा आकडा 600 पार

सदर प्रकरण सुनावणीस आले असता मडगाव पालिकेचे वकील अभिषेक सावंत यांनी हा प्रश्न पालिकेने गांभीर्याने घेतला असून त्यावर तोडगा काढला जाईल असे सांगितले. त्यावर खंडपीठाने प्रदूषण नियंत्रण मंडळ, मलनि:स्सारण महामंडळ तसेच सार्वजनिक बांधकाम खात्‍याने याकामी पालिकेला साहाय्‍य करावे असे सूचित केले. या प्रकरणात जारी केलेल्या नोटिसांवर सुनावणी घेतली गेली, पण काही अपरिहार्य कारणास्तव त्याला विलंब झाला.

मलमूत्र तोडग्यासाठी मडगाव पालिकेला 4 आठवडे मुदत
'सुवर्ण महोत्सवी प्रकल्पाकडे' मुरगाव नगरपालिकेचे दुर्लक्ष!

पण आता त्या नोटिसा निकालात काढल्या जातील असेही पालिकेच्या वकिलांनी न्‍यायालयात सांगितले.

नावेली येथील आंतोनियो आल्वारीस यांनी या प्रकरणात जनहित याचिका दाखल केली होती. गटारांत मोठ्या प्रमाणात सोडले जाणारे मलमूत्र नंतर शेतीत तसेच जलस्रोतांत जाऊन ते प्रदूषित होतात असे सांगून साळपे तळे तसेच प्रदूषित झाल्याचा दावा त्यांनी केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com