कदंब महामंडळाच्या  40 आंतरराज्य बससेवा बंद

दैनिक गोमंतक
गुरुवार, 29 एप्रिल 2021

महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यांनी कोरोना नियंत्रणासाठी कडक लॉकडाऊन लावल्यामुळे या राज्यात जाणाऱ्या कदंब महामंडळाच्या सुमारे 40 आंतरराज्य बसेस बंद ठेवाव्या लागल्या आहेत.

पणजी :  महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यांनी कोरोना नियंत्रणासाठी कडक लॉकडाऊन लावल्यामुळे या राज्यात जाणाऱ्या कदंब महामंडळाच्या सुमारे 40 आंतरराज्य बसेस बंद ठेवाव्या लागल्या आहेत. कदंब महामंडळाचे सरव्यवस्थापक संजय घाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र व कर्नाटक राज्यामध्ये  बेसुमार वाढलेला कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी दोन्ही राज्यांनी  कडक प्रतिबंध लावले आहेत. लॉकडाऊन सदृश्य हे निर्बंध असून त्यामुळे  सार्वजनिक वाहतूक बंद आहे. याचा परिणाम म्हणून कदंब महामंडळाच्या या दोन्ही राज्यांमध्ये ये-जा करणाऱ्या चाळीस बसेस कदंब महामंडळाला बंद कराव्या लागल्या आहेत. (40 inter-state bus services of Kadamba Corporation closed) 

Goa Lockdown: वास्को-मुरगावात राहणाऱ्या मजुरांनी धरला गावचा रस्ता

कर्नाटक राज्यातील बेळगाव, सौंदत्ती, धारवाड, हुबळी, हॉस्पेट,  बेंगळूरु , मंगळूरु आदी ठिकाणी कदंब महामंडळाच्या बसेस ये-जा करत होत्या. त्याचबरोबर महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे , सांगली,  मुंबई या भागामध्ये मोठ्या प्रमाणात कदंब महामंडळाच्या बसेस ये-जा करत होत्या . कोरोना संकटामुळे या दोन्ही राज्यात  लॉकडाऊन लागल्यामुळे ४० बसेस बंद ठेवाव्या लागल्या आहेत अशी माहिती घाटे यांनी दिली. या दोन्ही राज्यांनी लॉकडाउन  उठवल्यानंतर व सार्वजनिक वाहतूक सुरू झाली तर पुन्हा  कदंबच्या बसेस सुरू केल्या जातील, असेही घाटे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या