न्‍युमोनियाचे दरवर्षी ४०० बळी

dainik gomantak
गुरुवार, 7 मे 2020

राज्य सरकारकडे असलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार २०१८ साली राज्यात न्‍युमोनियामुळे एकूण ३५४ जणांचा मृत्‍यू झाला. त्‍यापैकी २५१ मृत्यू ग्रामीण भागात झाले, तर १०३ मृत्यू हे शहरी भागातील होते. २०१७ व २०१६ या गतवर्षांमध्येही मृत्यूचे प्रमाण शहरी भागांच्या तुलनेत ग्रामीण भागातच जास्त असल्याचे पाहायला मिळाले. २०१७ या वर्षी राज्यात न्‍युमोनियामुळे ४०० जण मृत्युमुखी पडले, त्यातील ३०६ ग्रामीण भागातील होते, तर ९४जण शहरातील होते. २०१६ साली ३८२ जणांचे न्‍युमोनियामुळे मृत्यू झाला. त्यातील २७९ प्रकरणे ग्रामीण भागातील होती, तर केवळ १०३ मृत्यू शहरी भागातील होते.

पणजी,

राज्यात न्‍युमोनियाच्या आजारामुळे दरवर्षी सुमारे चारशेजणांचा बळी जात आहे. न्‍युमोनियामुळे बळी जाणाऱ्यांची संख्या ग्रामीण भागात जास्त असल्‍याचे सरकारकडे उपलब्‍ध आकडेवारीवरून उघड होते. न्‍युमोनिया हा देशातील जुनाट आजार असून त्‍याचे कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या श्वसनाच्या आजाराशी साधर्म्य आहे. प्रसंगी रुग्‍णाला व्‍हेंटिलेटरसुद्धा लावावा लागतो. त्‍यामुळे न्‍युमोनियाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. 
राज्य सरकारकडे असलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार २०१८ साली राज्यात न्‍युमोनियामुळे एकूण ३५४ जणांचा मृत्‍यू झाला. त्‍यापैकी २५१ मृत्यू ग्रामीण भागात झाले, तर १०३ मृत्यू हे शहरी भागातील होते. २०१७ व २०१६ या गतवर्षांमध्येही मृत्यूचे प्रमाण शहरी भागांच्या तुलनेत ग्रामीण भागातच जास्त असल्याचे पाहायला मिळाले. २०१७ या वर्षी राज्यात न्‍युमोनियामुळे ४०० जण मृत्युमुखी पडले, त्यातील ३०६ ग्रामीण भागातील होते, तर ९४जण शहरातील होते. २०१६ साली ३८२ जणांचे न्‍युमोनियामुळे मृत्यू झाला. त्यातील २७९ प्रकरणे ग्रामीण भागातील होती, तर केवळ १०३ मृत्यू शहरी भागातील होते. 

उपचार विलंबामुळे मृत्‍यूचे प्रमाण अधिक 
न्‍युमोनियामुळे होणारे बहुतेक मृत्यू हे जागृतीअभावी आणि उपचारासाठी होणाऱ्या विलंबामुळे होतात, असे तज्‍ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. या उपचारामध्ये होणारा विलंब न्‍युमोनियाचा आजार वाढविण्यास कारणीभूत ठरतो. उशिरा होणारा औषधोपचार रुग्णावर फारसा परिणाम करू शकत नाही. तसेच रुग्णाला आजारातून बरे होणेही कठीण होऊन जाते. 

लक्षणे दिसल्‍यास काय करावे? 
न्‍युमोनियामुळे आजारी पडलेल्या रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याच्या पहिल्याच तासात उपचार सुरू केले जातात आणि विविध चाचण्‍या घेतल्‍या जातात. रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर विषाणूमुळे झालेल्या न्‍युमोनियाची ओळख पटविण्‍यासाठी आवश्यक सर्व चाचण्या घेतल्या जातात. ज्या विषाणूमुळे न्‍युमोनिया झालेला आहे, त्याची ओळख पटल्याशिवाय विशिष्ट असे उपचार डॉक्टरांना करता येत नाहीत. व्हेंटिलेटरमुळे रुग्णांना श्वास घेणे सोपे होते. ज्यामुळे या वेळेत डॉक्टरांना आजाराचे निदान करून उपचार करणे सोपे होते. ज्या रुग्णांची स्थिती नाजूक असते, त्‍यांनाच व्हेंटिलेटरवर ठेवावे लागते. 

न्‍युमोनियामुळे काय होते? 
एक निरोगी व्यक्ती श्वास घेते, तेव्हा फुफ्फुसात ऑक्सिजनमुळे भरतात. न्‍युमोनिया असलेल्या व्यक्तीने श्वास घेतल्यावर त्याच्‍या फुफ्फुसात पाणी वा द्रवपदार्थाने भरतात. त्‍यामुळे ऑक्सिजन घेताना, श्‍‍वास घेण्यास त्रास होतो. ज्‍यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते, त्‍यांना न्‍युमोनियाचा आजार होत नाही. ज्येष्ठ नागरिकांना न्‍युमोनिया होण्याची शक्यता जास्त असते. कारण, वयोमानानुसार त्‍यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते. मधुमेह, यकृत आणि मूत्रपिंडाचे आजार असणाऱ्या व्यक्तींना न्‍युमोनिया होण्याची शक्यता जास्त असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. 
 
संबंधित बातम्या