शेटगावकर कदंबचे उत्‍कृष्‍ट कर्मचारी

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

कदंब महामंडळाच्‍या ४०व्‍या वर्धापनदिनानिमित्त मरडीवाडा - मोरजी येथील कदंब कर्मचारी सुरेश शेटगावकर यांचा मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्‍या उपस्‍थितीत ‘२०१९ ते २०’ या वर्षीचा उत्‍कृष्‍ट कंडक्‍टर म्‍हणून महामंडळाचे चेअमन कार्लुस आल्‍मेदा यांच्‍या हस्‍ते गौरविण्‍यात आले.

हरमल: कदंब महामंडळाच्‍या ४०व्‍या वर्धापनदिनानिमित्त मरडीवाडा - मोरजी येथील कदंब कर्मचारी सुरेश शेटगावकर यांचा मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्‍या उपस्‍थितीत ‘२०१९ ते २०’ या वर्षीचा उत्‍कृष्‍ट कंडक्‍टर म्‍हणून महामंडळाचे चेअमन कार्लुस आल्‍मेदा यांच्‍या हस्‍ते गौरविण्‍यात आले.

कोविड १९ टाळेबंदीच्‍या मजुरांना अन्नवाटप करण्‍यात त्‍यांनी मोठा वाटा उचलला होता. श्री. शेटगावकर हे सध्‍या पणजी आगारमध्‍ये कार्यरत आहेत. ते एक चांगले लोकलाकार असून दाडोबा देवस्‍थानचे ते विद्यमान अध्‍यक्ष आहेत. त्‍यांच्‍या सत्‍काराबद्दल अभिनंदन करण्‍यात येत 
आहे.

संबंधित बातम्या