२२ वर्षांनंतर 'अंटार्क्टिका'च्या 40व्या मोहिमेस आज गोव्यातून सुरूवात

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 4 जानेवारी 2021

गोव्यातून अंटार्क्टिकावरील ४० व्या मोहिमेस आज सुरवात झाली. २२ वर्षांच्या खंडांनंतर गोव्यातून ही मोहीम रवाना झाली.

पणजी :  गोव्यातून अंटार्क्टिकावरील ४० व्या मोहिमेस आज सुरवात झाली. २२ वर्षांच्या खंडांनंतर गोव्यातून ही मोहीम रवाना झाली. गेल्या वर्षापर्यंत केप टाऊन येथून ही मोहिम रवाना केली जात होती. रशियातून मागवलेल्या खास जहाजातून या मोहिमेतील संशोधक अंटार्क्टिकावर रवाना झाले. कोरोना महामारी काळात ही मोहिम रवाना करताना फार काळजी घेण्यात आली आहे. संशोधक यामुळे जाताना कोणालाही भेटू शकले नाहीत. हे ४३ संशोधक वर्षभर अंटार्क्टिकावर राहणार आहेत.

संबंधित बातम्या