राज्यात महिन्याला 41 कुटुंबे होत आहेत उद्ध्वस्त

गेल्या 4 वर्षांत 948 जणांचा मृत्यू, 993 गंभीर जखमी, गोव्यातील (Goa) खराब रस्ते (Road) मुख्यतः या अपघाती (Accident) बळींना कारणीभूत ठरले. गोव्यातील 90 टक्के अपघात खराब रस्त्यांमुळे होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
राज्यात महिन्याला 41 कुटुंबे होत आहेत उद्ध्वस्त
गोव्यात (Goa) दर महिन्यात 41 कुटुंबे अपघातामुळे उद्ध्वस्तDainik Gomantak

मडगाव: केवळ 12 तालुक्यांचे राज्य असलेल्या लहानशा गोव्यात (Goa) दर महिन्याला सरासरी 20 जणांचा अपघाती (Accidental) मृत्यू होतो आणि सरासरी 21 जण गंभीर जखमी होतात. याचाच अर्थ असा की गोव्यात दर महिन्यात 41 कुटुंबे अपघातामुळे उद्ध्वस्त होतात किंवा तणावाखाली येत आहेत.

पहिल्याच पावसात गोव्यातील अनेक रस्ते पाण्यात

संपूर्ण जग 21 नोव्हेंबर रोजी जागतिक रस्ता (Road) अपघात पीडित स्मृतिदिन पाळत असून त्यानिमित्ताने मागच्या चार वर्षांत गोव्यातील अपघाती बळींचा आढावा घेतला असता एकूण 48 महिन्यांत (जानेवारी 2018 ते ऑक्टोबर 2021) गोव्यात तब्बल 948 लोकांचा रस्ता अपघातात बळी गेला असून 993 जण गंभीर जखमी झाले आहेत. गोव्यातील खराब रस्ते मुख्यतः या अपघाती बळींना कारणीभूत ठरले. गोव्यातील 90 टक्के अपघात खराब रस्त्यांमुळे होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

जगात दरवर्षी करोडो लोक अपघातात बळी जातात. या अपघातांविषयी लोक संवेदनशील बनावेत आणि हे बळी कमी करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत यासाठी २१ नोव्हेंबर रोजी जागतिक रस्ता अपघात पीडित स्मृतिदिन पाळला जात आहे. या चळवळीची सुरवात १९९५ मध्ये ‘युरोपियन फेडरेशन ऑफ रोड ट्राफिक व्हिक्टिम्स’ या संघटनेने केली होती. ऑक्टोबर २००५ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने त्या चळवळीला मान्यता दिली.

वर्ष बळी जखमी

2018 262 346

2019 297 265

2020 223 212

2021 166 170

टीप : 2021 सालची आकडेवारी ऑक्टोबरपर्यंतची आहे.

गोव्यात (Goa)  दर महिन्यात 41 कुटुंबे अपघातामुळे उद्ध्वस्त
गोव्यातील रस्ते होणार चकाचक

‘गोवा कॅन’च्या सूचनांना हरताळ

‘गोवा कॅन’ संघटनेचे निमंत्रक रोलंड मार्टिन्स यांनी अपघात कमी करण्यासाठी गाव पातळीवर जागृती करण्याची गरज असून प्रत्येक ग्रामपंचायत आणि पालिका स्तरावर रस्ता व्यवस्थापन समित्यांची नेमणूक करून या समित्यांकडून आलेल्या सूचनांनुसार रस्त्यात आवश्यक ते बदल करण्याची गरज व्यक्त केली. पण दुर्दैवाने तसे होत नाही, अशी खंत व्यक्त केली.

कोरोना काळात घट

मागच्या चार वर्षांच्या आकडेवारी पाहिली तर कोविड निर्बंधामुळे वाहतुकीवर काही प्रमाणात नियंत्रण आल्यामुळे 2020 साली रस्ता अपघातातील बळींची संख्या बरीच कमी होऊन 223 वर पोहोचल्याचे दिसून येते. तर 2018 साली हे प्रमाण 262 तर 2019 साली 297 एवढे होते. यंदा 2021 साली पहिल्या 10 महिन्यांत 166 जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. 2018 साली 346, 2019 साली 265, 2020 साली 212 तर 2021 साली ऑक्टोबर अखेरपर्यंत 170 जण गंभीर जखमी झाले आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com