गोव्यात चोवीस तासांत 42 जण कोरोनामुक्त 

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 4 मार्च 2021

राज्याला कोरोना नियंत्रणाच्या मोहिमेत आज पुन्हा एकदा दिलासा मिळाला. आज दिवसभरात एकाही कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीचे निधन झाले नाही.

पणजी: राज्याला कोरोना नियंत्रणाच्या मोहिमेत आज पुन्हा एकदा दिलासा मिळाला. आज दिवसभरात एकाही कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीचे निधन झाले नाही. आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार 3 रोजी 70 व्यक्ती कोरोना संसर्ग झालेल्या आढळल्या. तर आज 42 व्यक्ती कोरोना संसर्गमुक्त झाल्या. आजच्या दिवशी कोरोनावर उपचार घेणाऱ्यांची संख्या 610 झाली असून कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्ती बरे होण्याची टक्केवारी 97.45 वर पोहोचली आहे. मागील काही दिवसांपासून कोरोना संसर्ग व सरासरी मृत्‍यूंचे प्रमाण वाढले होते. त्‍यामुळे कोरोनाचा संसर्ग पुन्‍हा वाढतो की काय, अशी परिस्‍थिती निर्माण झाली होती.

कोविड प्रतिबंधक लसीकरणीला प्रतिसाद

राज्यात 1 मार्चपासून सुरू झालेल्या 60 वर्षावरील व्यक्ती आणि 45 वर्षांवरील आजारी व्यक्तींना कोविड प्रतिबंधक लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज तिसऱ्या दिवशी एकूण 2488 व्यक्तींनी कोविड प्रतिबंधक लस टोचून घेतली. यामध्ये ४५ वर्षांवरील आजारी 317 व्यक्तींनी, तर 60 वर्षांवरील 2171 व्यक्तींनी कोविड प्रतिबंधक लस टोचून घेतली. 1 मार्च रोजी 1220 जणांनी कोविड प्रतिबंधक लस टोचून घेतली होती. तर काल 2 मार्च रोजी 2020 जणांनी कोविड प्रतिबंधक लस टोचून घेतली होती. आज तिसऱ्या दिवशी 2488  जणांनी लस टोचून घेतली. त्यामुळे आतापर्यंत 45 वर्षांवरील आजारी व्यक्ती व 60 वर्षांवरील व्यक्ती यांनी मिळून तीन दिवसांमध्ये 5728 जणांनी कोविड प्रतिबंधक लस टोचून घेतली आहे. या लसीकरणाबरोबरच आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचारी यांनाही पहिला व दुसरा डोस देणे सुरू आहे. पोलिस, सुरक्षा रक्षक व कोरोना नियंत्रणासाठी काम केलेले सरकारी अधिकारी यांना सध्या पहिला डोस देण्यात येत आहे. आजच्या दिवसभरात आरोग्य क्षेत्रातील 277 जणांनी पहिला डोस घेतला, तर दुसरा डोस 767 जणांनी घेतला आहे. कोरोना योद्धांना व इतर 280 जणांनी आज पहिला डोस घेतला आहे.

महाराष्ट्रातील लसीकरण केंद्रे आता संध्याकाळीदेखील सुरू राहण्याची शक्यता 

संबंधित बातम्या