Parra Accident Case: पर्रा-साळगाव येथे दोन दुचाकींची भीषण टक्कर, थिवी येथील एकाचा मृत्यू

एका दिवसात उत्तर गोव्यात दोन दुचाकी अपघात
Parra Accident Case
Parra Accident CaseDainik Gomantak

उत्तर गोव्यात बुधवारी दिवसभरात दोन अपघात झाले. धक्कादायक बाब म्हणजे दोन्ही अपघात हे दुचाकीचे असून, त्यात दोघांनी आपला जीव गमावला आहे.

पर्रा साळगाव जंक्शन येथे दोन दुचाकींची भीषण टक्कर झाली. या एका व्यक्तीला गंभीर दुखापत झाली व यात त्याचा मृत्यू झाला. मृत व्यक्ती थिवी येथील रहिवाशी असल्याची माहिती समोर आली आहे.

Parra Accident Case
Goa - Mumbai Highway Accident : पेडणे येथील दुचाकी अपघातात सावंतवाडीतील युवक ठार

मिळालेल्या माहितीनुसार, सत्पुरूष साळगावकर (वय 42, रा. थिवी) असे या व्यक्तीचे नाव आहे. दोन्ही दुचांकीची टक्कर झाल्यानंतर साळगावकर दुखापतग्रस्त झाले. दरम्यान, यात त्यांचा मृत्यू झाला. तर, संशयित दुचाकीस्वाराने घटनास्थळावरून पळ काढला. अशी माहिती मिळाली आहे.

Parra Accident Case
Panajim Fire News : चिंचोळे येथील आगीत तब्बल 20 लाखांचे नुकसान

दरम्यान, आजच्याच दिवशी दुपारी धारगळ पेडणे येथे दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात 25 वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यु झाला आहे. वासुदेव पेडणेकर (25) रा. निरवडे असे या युवकाचे नाव आहे. गोव्यात कामाला असणारा वासुदेव दुचाकीवरू आपल्या गावाला जात असताना धारगळ जवळ त्याचा अपघात झाला. दुचाकी स्लिप झाल्याने हा अपघात झाल्याचे समजत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com