गोवा : सांगे पालिकेसाठी  ४३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

दैनिक गोमंतक
रविवार, 18 एप्रिल 2021

सांगे नागरपालिकेच्या दहा प्रभागांची निवडणूक येत्या तेवीस तारखेला होत असून कोणत्याही पक्षाने आपले पॅनल अद्याप जाहीर केले नसले, तरी मतदारांना कोण कुठला उमेदवार ते आतापर्यंत कळून चुकले आहे. काहीजण उघडपणे तर काहीजण छुप्यारीतीने आपल्या उमेदवारांना पाठिंबा देत आहेत. एकूण ४३ उमेदवार रिंगणात असून त्यात गेल्या नगरपालिकेतील पाच माजी नगरसेवक उभे आहेत.

सांगे:  सांगे नागरपालिकेच्या दहा प्रभागांची निवडणूक येत्या तेवीस तारखेला होत असून कोणत्याही पक्षाने आपले पॅनल अद्याप जाहीर केले नसले, तरी मतदारांना कोण कुठला उमेदवार ते आतापर्यंत कळून चुकले आहे. काहीजण उघडपणे तर काहीजण छुप्यारीतीने आपल्या उमेदवारांना पाठिंबा देत आहेत. एकूण ४३ उमेदवार रिंगणात असून त्यात गेल्या नगरपालिकेतील पाच माजी नगरसेवक उभे आहेत. चारजण एकमेकांविरुद्ध, तर एकटा नव्या उमेदवाराना टक्कर देत आहे. या पालिका निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी प्राप्त झाली आहे. पाच जुन्या नगरसेवकांपैकी दोघांना घाम काढावा लागत आहे, तर एका ठिकाणी दोन माजी नागरसेवकांत अटीतटीची लढत होत आहे. (43 candidates in the fray for Sange Palika) 

गोवा: सरकारला सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याचे सोयरसुतक नाही : डॉ. केतन...

या निवडणुकीत पालिकेने वाढविलेली भरमसाठ घरपट्टी हा विषय आणि दुकानदारांच्या पाठीशी लावलेले वाढीव भाडेपट्टीचे शुक्लकाष्ट प्रत्येक मतदाराच्या तोंडी चर्चिला जात आहे. घरपट्टी हा विषय सरकारने ठरविला असला तरी गेल्या पंचवीस वर्षात घरपट्टी वाढ न करता एकाच वेळी शेकडो पटीने वाढ करून सर्वसामान्य नागरिकांना जड ओझे करून ठेवले आहे. पालिका घरपट्टी कमी करू शकत नसल्यास गेल्या पंचवीस वर्षात टप्याटप्याने वाढ करून घेण्यासाठी पालिका मंडळ अपयशी ठरले आहे. जनतेला त्रास होऊ नये यासाठी योग्य निर्णय घेण्यासाठी पालिका मंडळाने केलेले दुर्लक्ष आता सर्वसामान्य मतदारांना परिणाम भोगावे लागत आहे. याचे उत्तर मतदार देण्याच्या तयारीत आहेत. 

गोवा: एनडीएचा राजीनामा देऊन विजय सरदेसाई यांनी प्रामाणिकपणा दाखवला 

तीच चूक पालिका मंडळाने गेल्या पंचवीस वर्षात केली आहे. केवळ मतांवर डोळा ठेवून घरपट्टी आणि दुकानदारांची भाडेपट्टी न वाढविता पालिका मंडळाने केलेली चूक सुधारण्यासाठी पालिका संचालकांनी पंचवीस वर्षाची भरपाई करण्यासाठी एकाच बरोबर वसुली करण्यासाठी केलेला प्रयत्न दुकानदार आणि घरमालकांना चिरडून टाकण्याचा ठरला आहे. मागच्या सर्व पालिका मंडळांनी सोयीस्कररित्या केलेली चूक आता जनतेला भोगावी लागत आहे. या दोन मुद्द्यावर आता मतदार लक्ष केंद्रित करू लागले आहेत. 

संपूर्ण पालिका भागात वाढविण्यात आलेली घरपट्टी आणि दुकानदारांची भाडेवाढ न पेलणारी झाली आहे. भाडेवाढ ही नगरसेवकांची चूक नसल्यास दुर्लक्ष केले ही चूक कोणी नाकारू शकत नाही. पालिकेतील कर्मचाऱ्यांकडून वेळोवेळी वसुली आणि कायद्यानुसार करात वाढ केली असती, तर आज ही स्थिती निर्माण झालीच नसती अशा प्रतिक्रिया मतदार व्यक्त करीत आहेत. 

या व्यतिरिक्त अजून बरेच विषय तसेच रेंगाळत पडले आहेत. पालिका व्यापारी संकुल दुसऱ्या टप्प्याबाबात अद्याप हालचाल नाही. टाऊन हॉल पाडून तिथे भव्य संकुल उभारणी करण्यात येणार होती, ती तर राहिलीच, पण जीर्ण टाऊन हॉल पाडणेही पालिका मंडळाला शक्य झाले नाही. पालिका मंडळ  बरखास्त होण्यापूर्वी घाईगडबडीत पालिकेने नव्याने बांधलेल्या विश्रामधाममध्ये गेल्या सहा महिन्यात कोणतीही सुविधा निर्माण करण्यात आलेली नाही. अर्धवट स्थितीत उद्‍घाटन सोहळा करण्यात आला. त्यात असलेल्या उणिवा लक्षात असूनही अद्याप सुधारलेल्या नाहीत. मोकाट गुरांचा प्रश्न मिटविण्यात आलेला नाही. अशा अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत, त्याला नव्याने निवडून येणाऱ्या नगरसेवक मंडळाला तोंड द्यावे लागणार आहे.

संबंधित बातम्या