इंडोको रेमेडीज कंपनीच्या महसुलात 43 टक्के वाढ

आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीच्या महसुलात 43 टक्के वाढ झाली आहे.
इंडोको रेमेडीज कंपनीच्या महसुलात 43 टक्के वाढ
43% increase in revenue of Indoco RemediesDainik Gomantak

फातोर्डा: इंडोको  रेमेडीज (Indoco Remedies) कंपनीने 2021-22 आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीच्या महसुलात 43 टक्के वाढ झाली आहे. गतवर्षीच्या 322.50 कोटी इतक्या महसुलाच्या तुलनेत या तिमाहीत कंपनीने 15.6 वृद्धीदरासह रु. 372.60 .कोटी इतक्या महसुलाची नोंद केली आहे.

43% increase in revenue of Indoco Remedies
रिव्हॉल्युशनरी गोवन्सच्या 9 उमेदवारांची पहिली यादी जाहीर..

गतवर्षीच्या 60.20 कोटी ईबीआयडीटीएच्या तुलनेत या तिमाहीत कंपनीने 23.2 टक्के वृद्धीसह 86.20 कोटी इतका ईबीआयडीटीए नोंदवला आहे. तर गतवर्षीच्या 25.10 कोटींच्या तुलनेत 11.20 टक्केच्या वृद्धीसह रु. 41.60 कोटींची नोंद केली आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत इंडोकोने गतवर्षीच्या रु. 589.30 कोटी महसुलाच्या तुलनेत 27.9 टक्केच्या वृद्धीसह रु 753.80 कोटी इतक्या महसुलाची नोंद केली असून गतवर्षीच्या 42.30 कोटी रुपये करोत्तर नफ्याच्या तुलनेत 10.8 टक्के वृद्धीदराने रु. 81.20 कोटी इतका नफा नोंदवला आहे.

या निकालावर भाष्य करताना इंडोकोच्या व्यवस्थापकीय संचालक अदिती पाणंदीकर म्हणाल्या, विक्रीमधील जोमदार वाढ, त्याचबरोबर आमच्या उत्पादन केंद्रांमधील कार्यक्षमता यांच्या जोरावर कंपनीने उत्कृष्ट कामगिरीची नोंद केली आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com