Vasco: राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन ४३ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या

Crime
CrimeDainik Gomantak

दाबोळी -बोगमाळो येथील एका ४३ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या (Suicide) करून जीवनयात्रा संपवली. या प्रकरणाचा तपास करणार्‍या वास्को पोलिसांनी तपास केला असता, मयत हा बोगमाळो येथील नौदल म्यूझियमच्या समोरील घरात राहत होता. पंख्याला टॉवेलच्या सहाय्याने गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. खोलीत मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मयूर सावंत करीत आहेत.

बलमसिंग बिस्त (४३) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तिचे नाव आहे. दाबोळी -बोगमाळो पंचायत क्षेत्रात नौदलाच्या म्यूझियमच्या समोरील लोकवस्तित गेली १५ वर्षे बिस्त वास्तव्य करीत होते. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून, वास्को पोलिस (Vasco Police) तपास करीत आहे.

Crime
FC Goa: मार्क व्हालेंते करारबद्ध, एफसी गोवाचा परदेशी खेळाडू कोटा पूर्ण

बोगमाळो नौदलाच्या म्यूझियमच्या समोरील लोकवस्तित राहणारा बलमसिंग बिस्त याने आपल्या घरातील बॅडरूम मध्ये बुधवार(दि.२७)अंदाजे सकाळी ८ ते ९-३० च्या दरम्यान गळफास लावला असल्याची शक्यता आजूबाजूच्या रहीवाशांनी व्यक्त केली आहे.बलमसिंग यांनी घरात गळफास लावल्याची माहीती पोलिसाना मिळताच वास्को पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसानी घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा करून बलमसिंग याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मडगाव येथील उपजिल्हा इस्पितळात पाठवून दिला आहे.बलमसिंग पेंटींग काम करीत होता,त्याच्या पश्चात पत्नी,दोन मूली एक मुलगा आहे. गळफास प्रकरणी पुढील तपास वास्को पोलिस स्थानकांचे उपनिरीक्षक मयुर सावंत करीत आहे.

Crime
Sangolda: जादा बिलावरून रेस्टॉरंट मालकाला शिवीगाळ, तीन वाहतूक पोलिस निलंबित

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com