४७६ पॉझिटिव्ह, २४५ जणांचा आरोग्यसुधार

Vilas Ohal
शनिवार, 15 ऑगस्ट 2020

कोरोनावरील उपचार घेण्यासाठी दाखल झालेल्या रुग्णालयातून आज दिवसभरात २४५ रुग्णांचे आरोग्य सुधारल्याने घरी गेले आहेत. तर त्याच्या दुप्पट म्हणजे ४७६ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. आज दिवसभरात मंडुर येथील ४५ वर्षीय आणि हाऊसिंग बोर्ड (साखळी) येथील ४९ वर्षीय पुरुषाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत कोरोनामुळे बळींची संख्या ९३ वर पोहोचली आहे. दरम्यान, पणजीसह चिंबल, मये (९७) येथील रुग्ण संख्यावाढ नागरिकांमध्ये भीती पसरवणारी असल्याचे आरोग्य संचालनालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

विलास ओहाळ

पणजी :

आरोग्य संचालनालयाच्या आकडेवारीनुसार आज दिवसभरात ३ हजार ७०७ जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले. त्यात २ हजार ४५१ जण निगेटिव्ह, तर ४७६ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. ७८० जणांच्या स्वॅबचे अहवाल येणे बाकी आहेत. एकूण सक्रिय रुग्ण ३ हजार ७२० आहेत. आयसोलेशन वॉर्डमध्ये १०० रुग्ण दाखल आहेत. घरगुती आणि हॉटेलमध्ये क्वारंटाईन झालेल्यांची संख्या ५३ आहे. होम आयसोलेशन म्हणून ३०८ जण उपचार घेत आहेत.
उत्तर गोव्यातील चिंबल, पर्वरी, म्हापसा, पणजी, साखळी, पेडणे आणि वाळपई या आरोग्य केंद्रांतर्गत रुग्णांची असलेली संख्या चिंता वाढविणारी आहे. याठिकाणी दिवसेंदिवस रुग्ण वाढत आहेत. दक्षिण गोव्यातही मडगाव, वास्को, कुठ्ठाळी, कुडतरी, धारबांदोडा आणि फोंडा येथील आरोग्य केंद्राद्वारे नोंदीत झालेली रुग्णसंख्या विचार करायला लावणारी ठरत आहे.
कोरोनाची लक्षणे आढळली नसतानाही सुरक्षिततेचे उपचार म्हणून केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक हे घरीच आयसोलेशनमध्ये उपचार घेत होते. परंतु काल (गुरुवारी) मध्यरात्री त्यांचा ताप अचानक वाढल्याने त्यांनी आपणास रुग्णालयात नेण्यास सांगितले. त्यानुसार त्यांना दोनापावला येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

शंभरपेक्षा जास्त रुग्णसंख्या
नोंदीत असलेले आरोग्यकेंद्रे
मडगाव.............४०७
वास्को..............३९४
कुठ्ठाळी ...........२१८
चिंबल...............२०७
पणजी................१८८
फोंडा.................१८२
धारबांदोडा...........१५२
वाळपई...............१४४
म्हापसा...............१३९
पर्वरी.................१३६
पेडणे.................१३६
साखळी..............११२
कुडतरी..............१०५

संपादन : महेश तांडेल

संबंधित बातम्या