आयपीएल सट्टेबाजी प्रकरणी गोव्यात आणखी पाच जणांना अटक

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑक्टोबर 2020

बार्देशमधील किनारी भागात सट्टेबाजी करणाऱ्या पाच जणांना कळंगुट पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतले. पंचवीस हजार रुपये रोख, तसेच १५ मोबाईल संच आणि तीन लॅपटॉप अशा साहित्यासह त्यांना ताब्यात घेण्यात आले.

शिवोली-  सध्या ‘आयपीएल’ स्पर्धा सुरू असल्याने सट्टेाबाजीचे प्रमाणही वाढले आहे. या संदर्भात बार्देशमधील किनारी भागात सट्टेबाजी करणाऱ्या पाच जणांना कळंगुट पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतले. पंचवीस हजार रुपये रोख, तसेच १५ मोबाईल संच आणि तीन लॅपटॉप अशा साहित्यासह त्यांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई बागा येथील तवा-पॅलेसमध्ये करण्यात आली.

सट्टेबाजीत दंग असलेले इंदोरचे मनोज थडानी (३९), बंटी डांगी (३२), चिंटू धोध्योय (२१), मुंबईचा रुपेश सिंग (३२), नेपाळचा जगदीश नेपाळी (४७) यांना कळंगुट पोलिस पथकाकडून रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. सिएसके क्रिकेट टीम तसेच रॉयल चेलेजर्स  यांच्यात खेळल्या जाणाऱ्या टीमवरुन ही सट्टेबाजी चालली होती. शनिवारच्या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या सर्वच्या सर्व पाचही आरोपींची सध्या स्थानिक पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या कारवाईत निरीक्षक नोलास्को रापोझ, यांच्या समवेत उपनिरीक्षक राजाराम बागकर, हवालदार विनोद नाईक, पोलिस विनय श्रीवास्तव आदींनी भाग घेतला

संबंधित बातम्या