Goa Police: गोवा पोलिसांकडून 5 बांगलादेशींची थेट मायदेशी पाठवणी

राज्यातील बांगलादेशींची शोधमोहीम अतिरेकीविरोधी पथक व जिल्हा पोलिसांनी सुरू केल्यानंतर सुमारे 45 जणांना ताब्यात घेण्यात आले होते.
Goa Police
Goa PoliceDainik Gomantak

Goa Police: राज्यातील बांगलादेशींची शोधमोहीम अतिरेकीविरोधी पथक व जिल्हा पोलिसांनी सुरू केल्यानंतर सुमारे 45 जणांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यातील आजपर्यंत 5 जणांची कायदेशीर प्रक्रिया करून त्यांची बांगलादेशमध्ये पाठवणी करण्यात आली आहे

तर उर्वरित बांगलादेशींची पाठवणी करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यांच्यावर संबंधित क्षेत्रातील पोलिस स्थानक पोलिसांकडून देखरेख ठेवण्यात आली असल्याची माहिती विदेशगमन क्षेत्रीय नोंदणी विभागाच्या (एफआरआरओ) अधिकाऱ्यांनी दिली.

देशभरातील बांगलादेशींविरुद्ध धडक शोधमोहीम सुरू झाल्यानंतर गोवा पोलिसांनीही ती राबविली होती. अनेक बांगलादेशी गोव्यामध्ये बेकायदेशीर वास्तव्य करून राहत आहेत.

काहींकडे तर गोव्यातील वास्तव्य असलेल्या पत्त्यावरील आधारकार्डे तसेच निवडणूक ओळखपत्रेही आहेत. मात्र, त्यांच्या मूळ पत्त्याची तपासणी पोलिसांकडून करण्यात येत आहे.

काही बांगलादेशींची मुले गोव्यात शिकत असल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई प्रक्रिया संथगतीने करण्यात येत आहे. ते करत असलेला व्यवसाय व धंदा याच्यावरही नजर ठेवण्यात येत आहे. आता शोधमोहीम शिथिल झाली असल्यामुळे हे बांगलादेशी परत राज्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Goa Police
Mopa Airport: मोपावरून 26 मार्चनंतर आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांच्या सेवेस सुरुवात

त्यांनी दिलेली माहिती खोटी

यासंदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ही शोधमोहीम काही महिन्यांसाठी शिथिल करण्यात आली असली तरी अचानक ती पुन्हा सुरू केली जाईल.

राज्यात वास्तव्य करून असलेल्या बांगलादेशींकडे भारतातील वास्तव्याचा पत्ता आहे. ज्या 45 बांगालदेशींना आतापर्यंत शोधण्यात आले आहे त्यांनी सादर केलेला पत्त्यावर त्यांचे कोणीच नातेवाईक राहत नाहीत. त्यामुळे हे पत्ते बनावट असल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध झाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com