राज्यात कोरोनाचे ५ बळी

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

  राज्यात आणखी ५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोना बळींची संख्या ६०९ वर येऊन पोहचली आहे. दरम्यान, आज दिवसभरात १४२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संपूर्ण राज्यभरात सापडले, तर २३७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

पणजी :  राज्यात आणखी ५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोना बळींची संख्या ६०९ वर येऊन पोहचली आहे. दरम्यान, आज दिवसभरात १४२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संपूर्ण राज्यभरात सापडले, तर २३७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा आता कमी होत असून राज्याचा रिकव्हरी रेट ९३.४८ टक्के इतका असल्याची माहिती गोवा आरोग्य खात्याने दिली. राज्यात सध्या २२४४ इतके कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. 

आज ५ जणांचा मृत्यू गोवा वैद्यकीय महाविद्यालय, बांबोळी येथेच झाल्याची माहिती मिळाली. यामध्ये चिंबल येथील ६८ वर्षीय पुरुष, डिचोली येथील ७० वर्षीय पुरुष, ४६ वर्षीय पुरुष आणि २५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. म्हापसा येथील ७२ वर्षीय पुरुषाचाही यामध्ये समावेश आहे. 

गेल्या चोवीस तासांत ८९२ चाचण्या करण्यात आल्या. आज ५७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी होम आयसोलेशनचा पर्याय निवडला, तर ४३ रुग्णांना इस्पितळात भरती करण्यात आले. राज्यात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी अजून खाटा शिल्लक आहेत. उत्तर गोव्यात १९६ खाटा, तर दक्षिण गोव्यात ६३५ खाटा शिल्लक आहेत. 

डिचोली आरोग्य केंद्रात ६७ रुग्ण, साखळी आरोग्य केंद्रात ८१ रुग्ण, पणजी आरोग्य केंद्रात १३० रुग्ण, कांदोळी आरोग्य केंद्रात ९९ रुग्ण, चिंबल आरोग्य केंद्रात १२८ रुग्ण, मडगाव आरोग्य केंद्रात २०८ रुग्ण, वास्को आरोग्य केंद्रात ९५ रुग्ण, फोंडा आरोग्य केंद्रात १२८ रुग्ण आणि नावेली आरोग्य केंद्रात ४३ रुग्ण कोरोनाच्या उपचारासाठी भरती आहेत.

देशात सक्रिय रुग्णांचा कमी होण्याचा कल सातत्याने कायम
सक्रिय कोरोनाच्या रुग्णांची संख्या देशात सलग तिसऱ्या दिवशी ६ लाखांपेक्षा कमी आहे. १७ राज्य/केंद्रशासित प्रदेशांत दर दहा लाखांमागे रूग्णांचा दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी झाला आहे. जवळपास तीन महिन्यांनंतर सतत तिसऱ्या दिवशी, सक्रिय रुग्ण संख्या सहा लाखांपेक्षा कमी आढळून आली असून सातत्याने ती कमीच होत आहे. सध्या भारतात सक्रिय रुग्णांची संख्या ५,७०,४५८ आहे. देशातील सक्रिय रुग्ण दर कमी होत असून तो आता ६.९७% इतका आहे, त्यात सातत्याने घट होताना दिसत आहे.

संबंधित बातम्या