आणखी ५ बळी

Tejshri Kumbhar
मंगळवार, 11 ऑगस्ट 2020

राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूचे सत्र सुरूच आहे. सोमवारी राज्यात पाच कोविड संसर्ग झालेल्‍या रुग्णांचा मृत्यू झाला. त्‍यामुळे कोविड मृतांची एकूण संख्‍या ८० झाली आहे. कोविड पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाणही वाढतेच असून गेल्या चोवीस तासात राज्यात ३१७ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले, तर २१३ रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. त्‍यामुळे २७४१ एवढे कोरोनाबाधित रुग्‍ण आहेत.

तेजश्री कुंभार

पणजी :

सोमवारी बळी गेलेल्‍यांत आके मडगाव येथील ४९ वर्षीय महिला, केपे येथील ७३ वर्षीय पुरुष, झुआरीनगर येथील ४७ वर्षीय पुरुष, इंदिरानगर चिंबल येथील ५५ वर्षीय पुरुष, माशेल फोंडा येथील ७४ वर्षीय महिलेचा समावेश आहे. आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार आजच्या दिवशी हॉस्पिटल आयसोलेशनमध्ये ५७ जणांना ठेवण्यात आले. १२९७ जणांच्‍या लाळेचे नमुने घेण्यात आले, तर २२६५ जणांचे अहवाल हाती आहेत.
रेल्‍वे, विमान आणि रस्तामार्गे आलेले २ रुग्ण आहेत. डिचोलीत २५, साखळीत ८४, पेडणेत ६८, वाळपईत १०५, म्हापसा १०३, पणजीत १०३, बेतकी येथे २२, कांदोळीत ७७, कोलवाळ येथे ५४, खोर्लीत ७३, चिंबल येथे १३१, पर्वरीत ७१, कुडचडेत ४९, काणकोणात २५, मडगावात २५४, वास्कोत ३८४, लोटलीत ४०, मेरशी येथे ३८, केपेत ६५, शिरोड्यात ४१, धारबांदोड्यात ८९, फोंडा येथे १७५, आणि नावेली आरोग्य केंद्रात ६० रुग्ण आणि राज्यात इतर ठिकाणीही रुग्ण आढळल्‍याची माहिती आरोग्य खात्याने दिली.

याले इन्स्टिटयूट ऑफ ग्लोबल
हेल्थसोबत आरोग्यमंत्र्याची चर्चा
याले इन्स्टिटयूट ऑफ ग्लोबल हेल्थ कोविड संदर्भातील त्यांच्याकडे केले जाणारे उपचार तसेच प्रोटोकॉल यासंदर्भात आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांच्यासोबत राज्यातील विविध वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चर्चा केली. यावेळी कोविड चर्चेचे आणि उपचाराबाबतच्या ज्ञानाचे आदानप्रदानही करण्यात आले. त्यांच्याकडून आम्हाला मिळालेली माहिती आणि इतर उपचार प्रणाली मार्गदर्शनाचा वापर आम्ही राज्यातील कोविडग्रस्तांच्या उपचारासाठी करणार असून याचा योग्य फायदा करून घेणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी दिली.

संपादन : महेश तांडेल

संबंधित बातम्या