Ponda News: दाभाळमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष; सुपारीचे पीक धोक्यात

50 एकर क्षेत्र पाण्याविना : सुपारीचे पीक धोक्यात; खाणपीटातील पाणी न सोडल्याचा परिणाम
Water
WaterDainik Gomantak

Water फेब्रुवारी महिन्यापासून आमच्या कुळागारांना पाण्याचा एक थेंबही मिळालेला नाही. कुळागरे पाण्याविना असल्याने हे आमच्या डोळ्यांनी बघवेनासे झाले आहे, अशी कैफियत दाभाळ येथील बागायतदारांनी व्यक्त केली.

येथील कुळागारात आम्ही अनेक प्रकारची पिके घेतो. जेव्हा खाणी सुरू होत्या व खाणमालकांकडे खाणींचा ताबा होता, तेव्हा वेदांता (सेसा) खाण कंपनी खाणपीटातील पाणी ओहोळातून सोडून आमच्या बागायतींना देत होते;

पण आता खाणमालकांकडे त्यांच्या खाणी न राहता सरकारच्या ताब्यात असल्याने यंदा पहिल्यांदाच आमच्या कुळागारांना पाणी मिळाले नाही, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली.

‘फिरंगी’ या बंधाऱ्यातून सर्व शेतकऱ्यांच्या कुळागारांसाठी मुबलक पाणी मिळत होते. फेब्रुवारी महिना झाला की, बंधाऱ्याच्या पाण्याची पातळी कमी होते. तेव्हा सेसा कंपनी खाणपीठातील पाणी काढून फिरंगी बंधाऱ्यात टाकत होती.

त्यामुळे पाऊस येईपर्यंत पाणी पुरायचेे. यंदा फेब्रुवारी महिन्यापासून कुळागारांना पाणी मिळालेले नाही, असे शेतकऱ्यांनी सांगितले. सुमारे ५० एकर क्षेत्रात पसरलेली दाभाळची ३६ शेतकऱ्यांची कुळागरे सुकली आहे.

Water
Biodiversity In Sattari: भूतलावरील खरी जैवसंपदा सत्तरीत!

कामाची फाईल मंजूर करा!

2020-21 साली आम्ही या ठिकाणी असलेल्या फिरंगी बंधाऱ्याची उंची वाढवून व्यवस्थित पाणीपुरवठा कायम करावा, अशी मागणी तत्कालीन आमदार तथा मंत्री दीपक पाऊसकर यांच्या माध्यमातून जलस्रोत खात्याकडे केली होती.

त्याला मंजुरी मिळूनही आजपर्यंत ते काम झालेले नाही. निदान आता तरी जलस्रोत खात्याने मंजूर झालेली फाईल पुढे पाठवूून आम्हाला कायम पाणीपुरवठा करावा, अशी मागणी तेंडुलकर, बाबय गावकर, दत्ता गावकर, प्रेमानंद गावकर, जितेंद्र सामंत, संतोष प्रभू या शेतकऱ्यांनी केली.

खाण कंपनीला साकडे

अहिल्याबाई सरदेसाई यांच्या खाणीत मोठ्या प्रमाणात जलसाठा आहे. या खाणीतील पाणी पंपद्वारे खेचून फिरंगी बंधाऱ्याच्या नदीत सोडले तर शेतकऱ्यांना या पाण्याचा लाभ होऊ शकतो.

हे पाणी सोडण्याबाबतची दखल जलस्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी घ्यावी, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com