'गोवा मुक्ति दिवसानिमित्त' ५००० गरजूंना अन्नदान

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 डिसेंबर 2020

सांगोल्डा येथील 'फूड बँक फॉर द पूअर' ही संस्था शनिवारी गोवा मुक्ती दिवसानिमित्त  बेघर आणि गरजू अशा 5000 लोकांना जेवण देण्याचा प्रयत्न करणार आहे.

पणजी: सांगोल्डा येथील 'फूड बँक फॉर द पूअर' ही संस्था शनिवारी गोवा मुक्ती दिवसानिमित्त  बेघर आणि गरजू अशा 5000 लोकांना जेवण देण्याचा प्रयत्न करणार आहे. तीन तासांमध्ये हा उपक्रम राबविण्यासाठी स्वयंसेवकांचे पथक रस्त्यावर, अनाथाश्रमातील मुले, आश्रयस्थानातील लोक, वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक आणि एचआयव्ही रूग्णांची भेट घेणार आहेत. 

आजच्या पिढीला गोवा मुक्ती दिवसाचे महत्त्व माहिती नाही. त्यांच्यासाठी ही केवळ सार्वजनिक सुट्टी असते. रस्त्यावर बेघर लोकांना आणि विविध निवारा गृहांमधील लोकांना अन्नदान करून, आम्ही त्यांना उपासमारीपासून मुक्त करू इच्छितो," असं या संस्थेचे विश्वस्त डोनाल्ड फर्नांडिस यांनी सांगितलं. हा उपक्रम साखळी, डिचोली, वापोली, गुइरीम, मोइरा, सियोलिम, सालीगाव, मारगाव, जुना गोवा, म्हाप्सा , वास्को, पणजी, बेनौलीम, सॅन जोस दे अरेआल आणि सॅनवॉर्डेम इथं राबवला जाणार आहे.

 

अधिक वाचा :

 

गोवा मुक्तिसंग्रामाच्या हीरक महोत्‍सवी वर्षासाठी गोवा सज्ज : राष्‍ट्रपतींच्‍या आगमनाची तयारी 

१०० कोटी हे एका दिवसाच्या कार्यक्रमासाठी नव्हे तर..

गोव्यातील जीवरक्षकांच्या समस्या राष्ट्रपतींसमोर मांडणार

संबंधित बातम्या