यंदाचा ‘इफ्‍फी’ महोत्सव जानेवारीत

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

मिळालेल्या माहितीनुसार माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. दरवर्षी हा महोत्सव २० ते २८ नोव्हेंबर या कालावधीत होतो.

पणजी: आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यावर्षी जानेवारीत होणार आहे. कोरोना महामारीमुळे हा महोत्सव प्रत्यक्ष आणि आभासी पद्धतीने १६ ते २४ जानेवारी या कालावधीत पार पडणार असल्याची माहिती मिळाली. यावर्षी या महोत्सवाचे ५१ वे वर्ष असणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. दरवर्षी हा महोत्सव २० ते २८ नोव्हेंबर या कालावधीत होतो. यावर्षीही याच कालावधीत आभासी पद्धतीने महोत्सव पार पडणार असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र, पुन्हा हा निर्णय बदलण्यात आल्याची माहिती देण्यात आली.  कोविड-१९ संबंधित सर्व नियम यावेळी काटेकोरपणे लागू करण्यात येणार असल्याची माहिती देण्‍यात आली.

नोव्हेंबर महिना जसा जवळ येईल, तसे अनेक सिनेप्रेमी इफ्फी आयोजनाबाबत चर्चा करीत होते. कोरोना महामारीमध्ये आभासी पद्धतीने इफ्‍फी घेण्याऐवजी पुढे ढकलण्यात यावा, अशी मतेही सोशल मीडियावर व्यक्त केली जात होती. मात्र, आताच्या या निर्णयामुळे सिनेप्रेमी नक्की आनंदी होणार आहेत.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या