‘व्हिजनरी’ संस्थेच्या 3 शाखांमध्ये 54 लाखांची अफरातफर; ठेवीदारांचा मुख्यमंत्र्यांना घेराव!

मुख्यमंत्र्यानीही ठोस आश्‍वासन न दिल्यामुळे त्यांनी निदर्शने करीत सहकारमंत्री गोविंद गावडे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
‘व्हिजनरी’ संस्थेच्या 3 शाखांमध्ये 54 लाखांची अफरातफर; ठेवीदारांचा मुख्यमंत्र्यांना घेराव!
Chief MinisterDainik Gomantak

पणजी : व्हिजनरी सहकारी संस्थेच्या (Visionaries Urban Cooperative) ठेवीदारांनी आज शनिवारी सहकार संकुलासमोर घेराव घालत जाब विचारला. यावेळी आंदोलक संतप्त झाले होते. मुख्यमंत्र्यानीही (Chief Minister Pramod Sawant) ठोस आश्‍वासन न दिल्यामुळे त्यांनी निदर्शने करीत सहकारमंत्री गोविंद गावडे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

व्हिजनरी सहकारी पतसंस्थेच्या तीन शाखा आहेत. त्यामध्ये सुमारे 54 लाखांची अफरातफर झाल्याचा ठेवीदारांचा आरोप आहे. त्यावरून शुक्रवारी ऐन सहकार सप्ताहाच्या समारोप समारंभावेळी ठेवीदारांनी हातात काळे झेंडे घेऊन सरकारच्या सहकार धोरणांचा निषेध केला.

Chief Minister
तृणमूल काँग्रेसकडे खाणसम्राटही आकर्षित!

यावेळी बोलताना मारिओ वादांगो म्हणाल्या, सदर संस्थेने आम्हांला फसविले आहेच. पण, त्यांची पाठराखण सहकार मंत्री गोविंद गावडे करीत आहेत. त्यांनी विधानसभेत केलेले वक्तव्य खोटारडे आहे. त्यांच्या खात्याने दिलेली माहितीदेखील चुकीची आहे. सरकार सर्वसामान्यांचे पैसे परत करण्यात अपयशी ठरले आहे.

केवळ एक टक्का लोक चूक करतात आणि संपूर्ण खात्याचे नाव खराब होते. तेच व्हिजनरी पतसंस्थेच्या बाबतीत झाले आहे. त्यामुळे सहकार चळवळीत प्रामाणिकपणे सर्वसामान्यांना न्याय आणि आर्थिक आधार देण्याचे आवाहन सहकार खात्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केले आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com