गोव्यात 24 तासात 56 रुग्णांचा मृत्यू; 2175 रुग्णांची कोरोनावर मात 

Goa corona update
Goa corona update

गोव्यात कोरोनाचा (Goa Corona) प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेवर दबाव वाढला आहे. आज राज्यात 4,195 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर, 2,175 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी गेले आहेत. मागच्या 24 तासात 56 कोरोना रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. राज्यात आतापर्यंत 1,12,462 कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर 79,189 रुग्णांनाही कोरोनावरती मात केली आहे. सध्या राज्यात 31,716 कोरोना रुग्ण उपाचार घेत आहेत. 1,557 रुग्णांनी आतापर्यंत आपला जीव गमवला आहे. (56 patients die in 24 hours in Goa; Overcoming corona of 2175 patients) 

दरम्यान, गोव्यात रविवारी सकाळी सात वाजल्यापासून पंधरा दिवसांची राज्यस्तरीय संचारबंदी सरकारने लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत (Dr. pramod sawant) यांनी आज सायंकाळी या निर्णयाची घोषणा केली. या संचारबंदी कालावधी मध्ये किराणा दुकाने सकाळी सात ते दुपारी एक आणि टेक अवे सर्विस देणारी किचन सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेतच खुली राहतील. फार्मसीना या बंदीतून वगळण्यात आले आहे. या संचार बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिस कायदेशीर कारवाई करतील असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

कामाशिवाय लोकांनी घराबाहेर पडू नये असे त्यांनी स्पष्ट केले. या पंधरा दिवसातील लग्न, निकाह, ख्रिस्ती विवाह, वाढदिवसाच्या पार्ट्या मुंज किंवा अन्य कौटुंबिक समारंभ हे रद्द केले जावेत त्यासाठी सरकार कोणतीही परवानगी देणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी आज सांगितले. रविवारपासून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे मालवाहतूकदार सोडून इतरांना राज्यात प्रवेश करण्यासाठी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र किंवा कोरोनाची लागण झालेली नाही असे वैध प्रमाणपत्र सोबत आणावे लागणार आहे. याविषयीचे तपशीलवार आदेश जिल्हाधिकारी यांच्या पातळीवर उद्या दुपारी चार वाजेपर्यंत जारी केले जातील असे मुख्यमंत्र्यांनी या विषयी अधिक माहिती विचारल्यावर सांगितले. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com