गोव्यात गेल्या 24 तासांत 57 नवे कोरोना रूग्ण; कर्नाटक, महाराष्ट्रामुळे चिंता वाढली

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 24 फेब्रुवारी 2021

गोवा राज्य सरकारच्या आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज दोन दिवसाच्या विसाव्या नंतर एका कोरोना संसर्गित रुग्णाचा मृत्यू झाला. गेल्या सात दिवसांमध्ये कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या दोन झाली आहे.

पणजी : गोवा राज्य सरकारच्या आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज दोन दिवसाच्या विसाव्या नंतर एका कोरोना संसर्गित रुग्णाचा मृत्यू झाला. गेल्या सात दिवसांमध्ये कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या दोन झाली आहे. आतापर्यंत राज्यात कोरोना संसर्गित झाल्यामुळे 788 व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे. आज दिवसभरात 57 नवे कोरोना संसर्ग झालेले रुग्ण आढळले. तर कोरोना संसर्ग झाल्यामुळे उपचार घेणाऱ्या 41 व्यक्ती गेल्या चोवीस तासांमध्ये बऱ्या झालेल्या आहेत. आज राज्यात कोरोना संसर्ग होऊन उपचार घेणाऱ्यांची संख्या 479 आहे.

गोवा पालिका निवडणूकीचा ‘चेंडू’ निवडणूक आयोगाच्या कोर्टात

राज्य सरकारच्या आरोग्य खात्याने कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या गंभीर उपाययोजनांमुळे राज्यात कोरोना नियंत्रणात आहे. मात्र त्याचबरोबर जवळच्या महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना संसर्ग होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे व महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात गोव्यामध्ये पर्यटक येत असल्यामुळे येत्या काळात गोव्यात कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या वाढण्याचा धोका निर्माण झालेला आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी या विषयावर मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचे घोषित केलेले आहे.चोविस तासात 57 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. 

कोरोना नियंत्रणात ठेवण्यास गोवा सरकारच्या आरोग्य खात्याला यश

गोव्याजवळच्या कर्नाटक, महाराष्‍ट्र राज्यांमध्ये कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. त्‍यामुळे राज्‍य सरकारने तातडीने खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी नवी कोरोना नियमावली (एसओपी) तयार करावी लागणार आहे. त्‍यासंदर्भात आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची आजच भेट घेऊन यासंदर्भात चर्चा करणार असल्‍याची माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी दिली. आरोग्यमंत्री राणे यांनी सांगितले की, महाराष्ट्रात, तसेच कर्नाटकात कोरोना संसर्ग होणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दिवसाला सहा हजाराच्या आसपास तेथे कोरोना रुग्ण सापडत असून कोरोना संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या तेथे वाढलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्र जवळच्या मध्यप्रदेश व कर्नाटक या राज्यांनी महाराष्ट्रातून येणाऱ्या लोकांवर बरेच निर्बंध लादले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून गोव्यामध्ये येणाऱ्या लोकांची संख्या मोठी असल्यामुळे गोवा सरकारलाही आता सतर्क राहावे लागेल, असे आरोग्‍यमंत्री श्री. राणे म्हणाले.

संबंधित बातम्या